काणकोण तालुक्यातील दापोली धरणावर होणार इको टुरिझम प्रकल्प…

सभापती रमेश तवडकर व पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी धरण परिसराला दिली भेट

Goan Varta Live | प्रतिनिधी

काणकोण : काणकोण तालुक्यातील दापोली धरण परिसरामध्ये इको टुरिझम प्रकल्प होणार आहे. आज शनिवारी काणकोणचे आमदार व सभापती रमेश तवडकर आणि गोवा सरकारच्या वन विकास महामंडळामंडळाच्या अध्यक्ष तथा पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी वन खात्याचा अधिकाऱ्यांसोबत दापोली धरण परिसराला भेट दिली व जागेची पाहणी केली.
हेही वाचाःआश्वे-मांद्रे येथे पार्टीच्या आयोजकांवर गुन्हा नोंद…

धरण परिसरामध्ये १ लाख ३६ हजार चौ.मी. जमीन रुपांतरीत

यावेळी बोलताना रमेश तवडकर यांनी सांगितले की, काणकोण व्हिजन अंतर्गत आपण विविध प्रकल्प हाती घेतले आहेत. दापोली धरण हे एका बाजूला पश्चिम घाट आणि दुसऱ्या बाजूला समुद्र परिसरामध्ये असल्यामुळे अत्यंत रमणीय आणि सुंदर असे ठिकाण आहे. या धरण परिसरामध्ये १ लाख ३६ हजार चौ.मी. जमीन रुपांतरीत केलेली आहेत. त्या जागेतील काही जागेत
इको टुरिझम प्रकल्प व्हावा यासाठी आपण वन विकास महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. दिव्या राणे यांना सूचना केल्यानंतर डॉ. राणे यांनी या प्रकल्पाच्या जागेची पाहणी करण्यासाठी आज या ठिकाणी भेट दिली.
हेही वाचाःन्यायालयाच्या आदेशाला वाटाण्याच्या अक्षता; संगीत पार्ट्यांचा धिंगाणा सुरूच!

परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत यासाठी आपले प्रयत्न

इको टुरिझमला प्राधान्य देऊन दापोली काणकोण परिसरात मोठ्या प्रमाणात पर्यटक यावेत यासाठी आपले प्रयत्न असल्याचे सांगून या प्रकल्पाबाबत डॉ. राणे व आपले एकमत झाल्याचे तवडकर यांनी सांगितले. हा भाग आदिवासी भाग आहे. येथे सुंदर प्रकल्प व्हावा आणि या भागाचा विकास व्हावा असे आपले धोरण असून या प्रकल्पाच्या माध्यमातून या भागातील विकासासाठी हे पहिले पाऊल ठरू शकते आणि येथे एक युनिक असा प्रकल्प उभा राहू शकतो असेही तवडकर यांनी सांगितले.
हेही वाचाःनव्या समितीवर काँग्रेस नेत्यांकडूनच प्रश्नचिन्ह!

परिसरातील युवक-युवतींना रोजगार प्राप्त होतील

काणकोण तालुक्यामध्ये मी पहिल्यांदाच आले आहे. एक सुंदर असा हा निसर्गरम्य परिसर आहे. दापोली धरण परिसरामध्ये जागा रिक्त आहे. या जागेमध्ये इंटर लेंड टुरीझम अंतर्गत एक इको टुरिझम प्रकल्प उभारून येथे चांगल्या सुविधा उभारल्यास मोठ्या प्रमाणात पर्यटक येथे येतील आणि या परिसरासोबतच गावांचा विकास होईल. परिसरातील युवक-युवतींना मोठ्या प्रमाणात रोजगार प्राप्त होतील असे डॉ. दिव्या राणे यांनी सांगितले.
हेही वाचाःपर्यटन उद्योग ढासळण्यामागे राज्य सरकार जबाबदार…

शंभर टक्के रोजगार हे स्थानिकांनाच मिळणार

धरण परिसरामध्ये असलेले हे ठिकाण फार सुंदर आहे. किनारी भागामध्ये जसे पर्यटक जातात तसेच पर्यटक अशा हिंटरलंड टुरिस्ट प्रकल्पा अंतर्गत गावागावात यावेत यासाठी आपले वन विकास महामंडळामार्फत प्रयत्न सुरू असल्याचे सांगून येथील शंभर टक्के रोजगार हे स्थानिकांनाच मिळणार असल्याचेही त्यानी सांगितले. अशा प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी सक्रियपणे पाठिंबा द्यावा असे आवाहन ही आमदार डॉ. राणे यांनी यावेळी केले . यावेळी स्थानिक सरपंच, पंच व नागरिक उपस्थित होते.
हेही वाचाःGoldy Brar detained: मुसेवालाच्या हत्येचा मास्टरमाईंड अखेर गजाआड

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!