जीएमसीत आता ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर्स

'सीएम'च्या निर्णयाचं सोशल मीडीयावर होतंय स्वागत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : कोविड रूग्णांसाठी ऑक्सिजनच्या कमतरतेवरून गेले काही दिवस गोवा सरकार आणि मुख्यमंत्री टीकेचं लक्ष्य होताहेत. उच्च न्यायालयानंही यासंदर्भात राज्य सरकारला सुनावलंय. यावर तातडीनं निर्णय घेत मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी जीएमसीत ड्युरा ऑक्सिजन सिलेंडर्स बसवण्याचा निर्णय घेतलाय. दरम्यान, सीएमनी घेतलेल्या या निर्णयाचं मात्र सोशल मिडीयावर जोरदार स्वागत होतंय.

संपूर्ण देशातच सध्या ऑक्सिजनची कमतरता आहे. त्याचमुळं कोविड रूग्णांचे मृत्यूही होताहेत. गोव्यातही अशीच परस्थिती असल्याचं समोर आलंय. मात्र काही दिवसांपूर्वी शेजारधर्म म्हणून मुख्यमंत्री डाॅ. सावंत यांनी सिंधुदुर्गला ऑक्सिजन देण्याचं मान्य केलं होतं. या निर्णयावर काॅंग्रेसनं टीका केली होती. गोव्यात ऑक्सिजन टॅेकर लिक होण्याचीही एक दुर्घटना घडली होती. त्यातच ‘जीएमसी’त ऑक्सिजनची कमतरता असल्याचं समोर आल्यानंतर उच्च न्यायालयानंही यासंदर्भात सरकारवर ताशेरे ओढले होते. या संपूर्ण स्थितीवर तातडीनं निर्णय घेत मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी ड्युरा सिलेंडर्सचा बॅकअप जीएमसीला देण्याचा मोठा निर्णय घेतलाय. ड्युरा सिलेंडर म्हणजे कमी आकारात जास्त क्षमतेचा, सर्वात जास्त काळ टिकून राहणारा, टीकावू असा ऑक्सिजन सिलेंडर आहे. दरम्यान, मुख्यमंत्री डाॅ. सावंत यांच्या या निर्णयाचं गोवेकरांनी सोशल मीडियावर स्वागत केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!