पावसामुळे चालकाला ‘ती’ गुरं दिसली नाहीत

काणकोण पोलिस निरीक्षकाची काँग्रेस पदाधिकाऱ्यांना माहिती

संजय कोमरपंत | प्रतिनिधी

काणकोण: गेल्या आठवडयात गुळे येथे एका ट्रक चालकाने एकाच जागी 11 गुरांचा प्राण घेतला होता. त्यासंबधी शुक्रवारी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस जनार्दन भंडारी यांच्या मार्गदर्शनाखाली काणकोणचे पोलिस निरीक्षक तुळशिदास नाईक यांची भेट घेऊन या अपघातासंबधी माहिती जाणुन घेतानाच पुढे काय पावलं उचलली आहेत यासंबधी निवेदन देऊन जाब विचारला.

हेही वाचाः आरजीचे सुप्रिमो मनोज परब यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पाऊस पडत असल्यानं गुरं दिसली नाहीत

पाऊस पडत होता. त्यामुळे रस्त्यावर बसलेली गुरं दिसली नसल्याचं अपघातास कारण ठरलेल्या ट्रक चालकाने चौकशी वेळी सांगितल्याचं असल्याचं पोलिस निरीक्षक तुकाराम चव्हाण यांनी सांगितलं.

हेही वाचाः आज CBSE बारावीचा निकाल! इथे चेक करा किती मार्क मिळाले?

अपघातांना आळा घालण्यासाठी विविध उपाय-योजना करण्याची विनंती

भटक्या गुरांसंबधी पंचायतींनी आणि नगरपालिकेने कोंडवाडे तयार करायला हवेत असा न्यायालयाचा आदेश असल्याची माहिती निवेदनाद्वारे भंडारी यांनी पोलिस निरीक्षकांना आठवण करून दिली. तसंच जे शेतकरी आपली गुरं बेवारस सोडत आहेत त्यांची संयुक्त बैठक घेऊन तोडगा काढावा, अशी मागणीही भंडारी यांनी केली. भटक्या गुरांच्या गळयात असे बेल्ट घालावेत, जेणेकरून रात्रीच्यावेळी वाहन चालकांना ती दिसतील आणि असे अपघात होणार नाहीत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

हेही वाचाः …आणि खुल्या जागेतच अविश्वास ठराव मंजूर, शिरदोन पंचायतीत अनोखा प्रकार

उपाय-योजना लवकरच करू

यासंबधी संबधीत अधिकाऱ्यांना पत्र लिहून उपाय योजना करण्यादृष्टीने प्रयत्न करणार असल्याचं पोलिस निरीक्षकांनी सांगितलं. यावेळी काँग्रेस गट अध्यक्ष प्रलय भगत, महिला गट प्रमुख उर्सिला कोस्टा, नवदीप फळदेसाई, झेवियर क्लेस्टन विएगस, दीपक पागी, मिथिल च्यारी, दयानंद फळदेसाई, सर्वानंद कोमरपंत, रुपेश काणकोणकर, चेतन भंडारी, वैष्णव पेड़णेकर, वैभव भट आणि राजेश वेळीप उपस्थित होते.

हा व्हिडिओ पहाः Video | Rape | Crime | आणखी एका तरुणीवरील बलात्काराच्या घटनेनं खळबळ

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!