बिगर गोमंतकीयांमुळे गोव्यात गुन्हेगारीच्या प्रमाणात वाढ

या संदर्भात सरकारने कडक पावलं उचलण्याची रिव्होल्यूशनरी गोवन्सची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी


पणजी: बिगर गोमंतकीयांकडून गोंयकारांवर अनेक घातक हल्ले झालेत, याचा गोवा साक्षीदार आहे. बंदुकीने गोळी झाडून समाज कार्यकर्ते,स्थानिक यांचे बळी गेलेले आहेत. यामुळे गोव्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत आहे. या सर्व गुन्ह्यांत बिगर गोमंतकीय सहभागी असलेले दिसून येतात, असं रिव्होल्यूशनरी गोवन्सने (आरजी) आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे. गेलं वर्षभर रिव्होल्यूशनरी गोवन्स यावर प्रकाशझोत टाकत आलंय. अशाप्रकारच्या घटनांमुळे गोवा हा युपी, बिहारप्रमाणे बनत चाललाय. यामुळे गोंयकारांच्या जीवाला धोका निर्माण झालाय.

हेही वाचाः शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ३१ जुलैपर्यंत पहिला डोस घ्यावा

बिगर गोमंतकीयांची कसून चौकशी व्हावी

अनधिकृतरीत्या झोपडपट्टीत राहणाऱ्या बिगर गोमंतकीयांची ओळख परेड घेतली जात नाही. त्यांची सविस्तर माहिती संबंधित सरकारी यंत्रणेकडून गोळा केली जात नाही. ही राजकीय वोट बँक असल्यानं शांतताप्रिय गोव्याच्या जीवनाला बाधा येत आहे. गोव्यात येणाऱ्या बिगर गोमंतकीय यांची पोलिसांतर्फे कसून चौकशी, तपासणी करण्यात यावी. त्यांच्या झोपडपट्ट्यांची आणि वसाहतींची तपासणी करण्यात यावी, अशी मागणी ‘आरजी’ने प्रसिद्धी पत्रकात केली आहे.

हेही वाचाः नोकरीच्या शोधात आहात, मग वाट कसली पाहताय? हे वाचाच!

सरकारने खास फौजेची नियुक्ती करावी

बिगर गोमंतकीयांच्या मूळ गावची ही माहिती गोळा करणं गरजेचं आहे. कारण गोवा हे पर्यटन क्षेत्र आहे. अशा गुन्हेगारी घटनांनी गोव्याचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नाहक बदनाम होऊ नये याची काळजी घेण्याची गरज आहे. यासाठी सरकारने खास पोलीस फौजेची नियुक्ती करावी. जेणेकरून गुन्हेगारी वृत्तीच्या बिगर गोमंतकीयांना आळा घालता येईल.

हेही वाचाः गोवा मानव संंसाधन विकास मंडळाच्या रक्षकांना नवीन नोकरीची चांगली संधी

गोंयकाराचा जीव सुरक्षित राहिला पाहिजे

गोवा हे शांतताप्रिय राज्य आहे. येथील प्रत्येक गोंयकाराचा जीव सुरक्षित राहिला पाहिजे. राजकीय वोट बँक आता संपवली पाहिजे. अनधिकृत मतदार कार्ड रद्द करायला हवीत. नुकताच सानकोळे येथे अमर नाईक यांच्यावर झालेला प्राणघातक हल्ला ही अंतिम इशाराची घंटा आहे. हे असंच सुरू राहिल्यास गोंयकारांना घराबाहेर पडणं फार कठीण होऊन बसेल, असं ‘आरजी’ने प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय.

हा व्हिडिओ पहाः Video | Crime | Inside Story | Amar Naik | पोलिसांच्या तपासाला यश, पण आव्हान कायम!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!