तौक्ती चक्रीवादळामुळं गोव्यातली विमानसेवा ठप्प

गोव्यात येणाऱ्या आणि जाणाऱ्या सर्व विमानफे-या रद्द

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : तौक्ती चक्रीवादळानं गोवा राज्यात केलेला कहर पाहता गोव्यात येणाऱ्या आणि गोव्यातुन जाणा-या सर्व विमानफे-या आज रदद करण्यात आल्या आहेत. गोवा एअरपोर्टच्या सुत्रांनी याबाबतची माहिती दिलीय. गोव्यात काल सायंकाळपासूनच चक्री वादळाचे पडसाद उमटू लागले होते. जोरदार लाटांबरोबरच समुद्राच्या पाणीपातळीतही वाढ झाली होती. पहाटेपासून तुफान वारा आणि पावसाला सुरूवात झाली. गोव्यातल्या अनेक भागात रस्त्यावर झाडं पडली. रस्ते ठप्प झाले. झाडं वाहनांवर पडुन मोठं नुकसान झालं. एका अपघातात तर युवतीचा मृत्यू झाला. दरम्यान, भारतीय हवामान खात्याच्या गोवा शाखेनं व्यक्त केलेल्या अंदाजानुसार 17 मे पर्यंत ताशी 100 ते 175 किमी इतक्या वेगानं वारे वाहतील. वीज कर्मचारी तर अजुनही वीजेच्या तुटलेल्या तारा व प्रवाहातले अडथळे काढण्यासाठी युध्दपातळीवर कार्यरत आहेत. या एकुण परस्थितीमुळं गोव्यात येणारी आणि गोव्यातुन जाणारी सर्व विमाने रदद करण्यात आली आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!