मोरजीत चरस जप्त; पेडणे पोलिसांची कारवाई

रशियन नागरिकाला अटक; 5 लाख किमतीचे अर्धा किलो चरस जप्त

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः कन्नईवाडा मोरजी येथे पेडणे पोलिसांनी एका कारवाईत मार्क स्मिस्लोव्ह नावाच्या एका रशियन नागरिकाला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी अर्धा किलो चरस जप्त केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात या ड्रग्सची किंमत 5 लाख रुपये आहे.

हेही वाचाः साखळी नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यांच्याविरोधात अविश्वास ठराव

पेडणे पोलिसांची कारवाई

पेडणे पोलीस निरीक्षक जिवबा दळवी यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना एका खात्रीपूर्वक सूत्राकडून माहिती  मिळाली, की मार्क स्मिस्लोव्ह नावाचा एका रशियनने राखाडी रंगाची मारुती स्विफ्ट (GA-11-A-2957) मध्ये ड्रग्स लपवले आहेत. ती गाडी भाड्याची असून ती गाडी तो सध्या ड्रग्सच्या डिलिव्हरीसाठी वापरत आहे. अशी माहिती मिळताच पोलिसांनी टीम तयार केली. 4 ऑगस्ट रोजी टेमवाडा मोरजी येथील किचन रेस्टॉरंटजवळ संध्याकाळी साडे चार वाजता पोलिसांनी छापा टाकला. पीआय जीवबा दळवी यांनी पीएसआय संजीत कांदोलकर, प्रवीण महाले, पीसी विनोद पेडणेकर, अर्जुन कलंगुटकर, संदेश वरक आणि महेश नाईक यांच्या टीमने ही कारवाई केली. ज्यामध्ये मार्क स्मायस्लोव्हला ड्रग्ससोबत रंगेहाथ पकडण्यात आलं.

हेही वाचाः वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 98.51 टक्के

रशियन नागरिकासह स्विफ्ट कार जप्त

या कारवाईत स्विफ्ट कारसह रशियन नागरिकाला ताब्यात घेण्यात आलं. पेडणे पोलीसांनी  संशयिताविरुद्धा गुन्हा नोंदवला आहे. म्हापसा एसडीपीओ गजानन प्रभुदेसाई आणि पोलीस अधीक्षक शोबित सक्सेना यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. 

हा व्हिडिओ पहाः Video | POLITICS | प्रदेशाध्यक्ष निवडीचा निर्णय हायकमांड घेतील!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!