आसगाव, हणजूण येथे ड्रग्ज जप्त

ड्रग्स बाळगल्याप्रकरणी अटक केलेल्या संशयित विदेशी नागरिकांसह पोलीस पथक.

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी

म्हापसा: हणजूण पोलिसांनी आसगाव आणि हणजूण अशा दोन ठिकाणी अमली पदार्थ विरोधी कारवाई केली.  नायजेरियन संशयित चिझोबा ओकेके (३५) आणि आयवोरी कोस्ट नागरिक संशयित डी ऑन आल्बर्ट (३१) या दोघा विदेशी नागरिकांना अटक केली.      

हेही वाचाः फोडाफोडीला सुरुवात! भाजपच्या माजी मंत्र्यांचा आपमध्ये प्रवेश

बुधवारी मध्यरात्री केली कारवाई

ही कारवाई पोलिसांनी बुधवारी मध्यरात्री केली. आसगाव येथे हॅप्पी बारजवळ पोलिसांनी संशयित चिझोबा ओकेके यास पकडले. त्याच्याजवळ ८१ हजारांचा एम्फेटामाईन आणि १३ हजारांचा इक्स्टसी हा ड्रग्ज सापडला. हा ड्रग्जसह संशयिताकडील जीए-३ एएन-२६६२ या क्रमांकाची स्कूटर जप्त केली.

हेही वाचाः मूर्तीमंत चैतन्य… ज्ञानाचा खजिना ‘भाई खलप’

१७ हजारांचा कोकेन सापडला

तर दुसरी कारवाई गाववाडी – हणजूण येथे बाबका केक शॉपजवळ करण्यात आली. संशयित डिऑन आल्बर्ट याच्याकडे १७ हजारांचा कोकेन सापडला. सदर ड्रग्ज पोलिसांनी जप्त केले. दोन्ही संशयितांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. पोलीस निरीक्षक सूरज गावस यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक स्नेहा सावळ, अक्षय पार्सेकर व सहकारी पोलिसांनी ही कारवाई केली. 

हा व्हिडिओ पहाः Video | ACCIDENT | डंपर अंगावर येताच तरुणाची दुचाकीवरून उडी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!