8.50 लाखाच्या ड्रग्जसह तिघांना ताब्यात घेतलं, मर्सिडीज कारही जप्त

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी
दोना पावला : राज्यात ड्रग्जविरोधी कारवाया सुरुच आहेत. शनिवारी रात्री क्राईम ब्रांचने ड्रग्जविरोधी कारवाई करत तिघांना ताब्यात घेतलंय. दोना पावलामधून तिघांना अटक करण्यात आली आहे.
राज्यात ड्रग्जविरोधी कारवायांचा धडाका सुरुच आहे. क्राईम ब्रांचने स्टार हॉटेल परिसरातून तिघांना ताब्यात घेतलंय. दोना पावलाजवळ असणाऱ्या या हॉटेलच्या परिसरात क्राईम ब्रांचने ड्रग्जविरोधी कारवाई केली. यावेळी केलेल्या कारवाईमध्ये तब्बल साडे आठ लाखांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत. तसंच तिघांना ताब्यात घेण्यात आलंय. ताब्यात घेण्यात आलेले श्रीमंत कुटुंबातील आहेत.
फक्त ड्रग्ज नव्हे तर पोलिसांनी या तिघांसोबतच एक आलिशाश मर्सिडीज बेन्ज कारही जप्त केली आहे. अटक करण्यात आलेले तिघांपैकी दोघे जण हे मुंबईचे आहेत. तर एक जण हैदराबादचा आहे. या तिघांचीही सध्या पोलिसांकडून कसून चौकशी सुरु आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यात ड्रग्जविरोधी कारवाया मोठ्या प्रमाणात सुरु असून अनेकांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.
अयान अली खान हा ताब्यात घेणारा पहिला संशयित आरोपी 42 वर्षांचा असून तो मूळचा हैदराबादचा आहे. तर इतर दोघेजण हे मुंबईतील वांद्रे पश्चिममध्ये राहणारे आहेत. यातील एकाचं नाव स्ट्रोम फर्नांडिस असून त्याचं वय अवघं 27 वर्ष आहे तर दुसऱ्याचं नाव वॅलेन्टाईन परेरा असून त्याचं वय 35 वर्ष आहे.
पाहा व्हिडीओ –