गोव्यातील ड्रग्सचे धागेदोरे हैदराबादपर्यंत!

फोंड्यातील युवकाला अटक; मोठमोठ्या क्लब चालकांसह १७४ जणांविरोधात गुन्हे

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी : ड्रग्स प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी फोंडा-गोवा येथील प्रीतेश बोरकर उर्फ काली (३६) याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला १६ ऑगस्ट रोजी अटक केली आहे. या प्रकरणात गोव्यातील आठ जणांसह १७४ जणांच्या विरोधात हैदराबाद पो​लिसांनी गुन्हे दाखल केले असून, त्यात राज्यातील मोठमोठ्या क्लब चालकांचाही समावेश आहे. 
हेही वाचा:फातोर्डातील एका वेटरचा मृत्यू, ‘हे’ आहे कारण…

मध्यरात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, हणजूण येथील प्रीतेश बोरकर १ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटुंबियांनी २ ऑगस्ट रोजी हणजूण पोलीस स्थानकात दाखल केली होती. त्यानुसार हणजूण पोलिसांनी प्रीतेश बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवून तपास सुरू केला. हा तपास सुरू असतानाच ३ ऑगस्ट रोजी हैदराबाद पोलिसांनी बोरकर कुटुंबीयांशी संपर्क साधून प्रीतेश याला ताब्यात घेतल्याची माहिती दिली. त्याच दरम्यान हणजूण पोलिसांनी बोरकर याचा शोध घेतला असता, त्याला एका खासगी गाडीतून नेण्यात आल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून स्पष्ट झाले. त्यानुसार हणजूण पोलिसांनी अधिक तपास केला असता बोरकर याला हैदराबाद येथील नाल्लाकुंटा पोलिसांनी ड्रग्स तस्करी प्रकरणी ३१ मार्च २०२२ रोजी दाखल केलेल्या १०२/२०२२ गुन्हे क्रमांकाच्या तपासासाठी ताब्यात घेतल्याची माहिती दिली.
हेही वाचा:चिखलीत अमली पदार्थ तस्करी प्रकरणी एकाला अटक…

प्रीतेशचा काश्मिरी युवकाशी संपर्क

दरम्यानच्या काळात प्रीतेश बोरकरचे कुटुंबीय त्याला हैदराबाद येथील कोठडीत भेटूनही आले होते.
दरम्यान, हैदराबाद येथील ओस्मानिया विद्यापीठ पोलिसांनी अटक करून प्रीतेश याची चौकशी केली असता, तो फोंडा-गोवा येथील असल्याचे समोर आले. कमी वेळेत जास्त पैसा कमावण्यासाठी तो हणजूण येथे आला. तेथे त्याचा संपर्क मनजूर अहमद या काश्मिरी युवकाशी आला. त्यानंतर तो ड्रग्स तस्करी व्यवसायात घुसला. प्रीतेश आणि मनसूर हे दोघे मिळून हणजूणसह किनारी भागांत हा व्यवसाय करीत होते.
हेही वाचा:करोना नियमांचे पालन करा : बोरकर…

गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना दोघे ड्रग्स पुरवत

दरम्यान प्रीतेशची तुकाराम उर्फ नाना साळगावकर, विकास उर्फ विकी नाईक, रमेश चौहान, स्टीव, एडवीन नुनीस, संजा गोवेकर या ड्रग्स तस्करी करणाऱ्यांशी संपर्क आला. याच व्यक्तींकडून प्रीतेश आणि मनसूर कमी किमतीत ड्रग्स घेत होते आणि जास्त दराने इतरांना विकत होते. गोव्यात येणाऱ्या पर्यटकांनाही हे दोघे ड्रग्स पुरवत होते. शिवाय हैदराबाद येथील युवकांच्या मागणीनुसार प्रीतेश आवश्यक त्यावेळी ड्रग्स पुरवठा करण्यासाठी हैदराबाद येथे येत होता, असे प्रीतेश याने पोलिसांना दिलेल्या जबाबातून स्पष्ट झाले आहे.
हेही वाचा:Crime | पर्रात घर फोडून पळवला ऐवज…

नेमके काय घडले?

– १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७.४५ वाजता एक युवक हाबसीगुडा येथील काकाटिया नगर परिसरात ड्रग्स तस्करीसाठी येणार असल्याची माहिती गुप्तहेरांनी हैदराबाद येथील ओस्मानिया विद्यापीठ पोलिसांना सायंकाळी ४ वाजता दिली होती.
– या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक एन. श्रीधर रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने काकाटिया नगर प​रिसरात अगोदरच जाळे पसरवले होते.
– संबंधित ठिकाणी पोलिसांनी एका युवकाला संशयाने ताब्यात घेतले व त्याची चौकशी करून झडती घेतली असता, तो ड्रग्स तस्करीसाठीच आल्याचे स्पष्ट झाले. त्याचे नाव प्रीतेश बोरकर असे असून, तो फोंडा-गोवा येथील आहे आणि तो हणजूण-गोवा येथे ड्रग्स तस्करी करीत असल्याचे समोर आले.
– प्रीतेशला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडून २० अॅक्सटसी टेबलेट्स, ५ एलएसडी बोल्टस् आणि ४ ग्रॅम एमडीएमए जप्त करण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी त्याच्या विरोधात अमली पदार्थ विरोधी कायद्याच्या विविध कलमांअंतर्गत गुन्हे नोंद करून त्याला रितसर अटक केली. चौकशी दरम्यान त्याच्याकडून गोव्यातील इतरांची नावेही बाहेर आली.
हेही वाचा:एकाच रात्रीत तीन ठिकाणी चोरट्यांचा ‘धुमाकूळ’…

प्रीतेशच्या अटकेने गोव्यात खळबळ

प्रीतेश बोरकर याला ड्रग्स प्रकरणात हैदराबाद पोलिसांनी अटक केल्याचे समोर आल्याने गोव्यात खळबळ उडाली आहे. हैदराबादहून गोव्यात येणाऱ्या काही युवकांना याआधी ड्रग्स बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेली होती. शिवाय, गोव्यातून ड्रग्स नेऊन ते हैदराबादमध्ये विकणाऱ्यांचाही पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. परंतु, आता गोव्यातीलच युवकाला या प्रकरणी हैदराबादमध्ये अटक केल्याने आणि या प्रकरणात बड्या व्यक्तींची नावे समोर आल्याने गोव्याची पुन्हा एकदा देशभर चर्चा सुरू झाली आहे.
हेही वाचा:Mirzapur 3 | ‘मिर्झापूर ३’ लवकरच चाहत्यांच्या भेटीला…

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!