डॉ. तिवारी जीएमसीचे नवे डीन होण्याची शक्यता

गोवा लोकसेवा आयोगाने केली शिफारस

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोवा लोकसेवा आयोगाने गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) डीनपदासाठी डॉ. जे. पी. तिवारी यांची शिफारस केली आहे. नवहिंद टाईम्सने दिलेल्या वृत्तानुसार ही माहिती समोर आली आहे.

हेही वाचाः गुणाजी मांद्रेकरांचं राष्ट्रीय युवा पुरस्काराने सन्मान

जीएमसीचे माजी डीन डॉ. प्रदीप नाईक यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त

राज्य सरकारने आपल्या कर्मचारी विभागाच्या माध्यमातून जीएमसी डीनच्या पदासाठी नियुक्तीसंदर्भात शिफारशीसाठी जीपीएससीकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यानंतर आयोगाच्या विभागीय पदोन्नती समितीने नुकत्याच झालेल्या बैठकीत नेफ्रॉलॉजीचे प्राध्यापक डॉ. जय प्रकाश तिवारी यांची डीन म्हणून नियुक्ती करण्याची शिफारस केली. जीएमसीचे माजी डीन डॉ. प्रदीप नाईक यांच्या निवृत्तीनंतर हे पद रिक्त झालं होतं. डीनचं पद सध्या डॉ. एस. एम. बांदेकर यांच्याकडे प्रभारी तत्त्वावर ठेवलं गेलं आहे.

डीनचे पद हे एक बढतीचं पद

डीनचे पद हे एक बढतीचं पद आहे आणि किमान पाच वर्षांचा अनुभव असलेले वरिष्ठ प्राध्यापक या पदावर नियुक्त होण्यास पात्र आहेत. आयोगाच्या डीपीसीने डॉ. तिवारी, डॉ. वाइझमन पिंटो आणि डॉ. एस. एम. बांदेकर यांच्या उमेदवारीचा विचार केला होता, त्यानंतर डॉ. तिवारी हे सर्वात वरिष्ठ प्राध्यापक असल्यानं त्यांची या पदावर नियुक्त करण्याची शिफारस करण्यात आली आहे.

हेही वाचाः शिरदोन सरपंचांवरील अविश्वास प्रकरणी संचालकांच्या आदेशाला अंतरिम स्थगिती

डीपीसीमध्ये जीपीएससीचे अध्यक्ष, मुख्य सचिव आणि आरोग्य सचिव यांचा समावेश आहे. लवकरच सरकार यासाठी आवश्यक आदेश जारी करेल अशी अपेक्षा आहे.

हा व्हिडिओ पहाः Politics | ALINA SALDHANA | २०२२मध्ये कुठ्ठाळीत मीच भाजप उमेदवार- एलिना

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!