मुलांना ताजं शिजवलेलं अन्न खाऊ घाला

डॉ. शेखर साळकरांचं गोंयकार पालकांना आवाहन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः मुलं काय खातात याची पालकांनी जाणीव ठेवली पाहिजे, असं मणिपाल रुग्णालयांचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. शेखर साळकरांनी गोंयकार पालकांना सांगितलं. कितीही बिझी शेड्युअल असलं तरीही पालकांनी आपली मुलं ताजं आणि घरी शिजवलेलं अन्न खातायत याची खात्री केली पाहिजे, असं डॉक्टरांनी म्हणाले. चांगला आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण यामुळे हृदयविकार आणि कर्करोगांसारखे अनेक आजार शरिरापासून दूर ठेवण्यास मदत होते, असं डॉक्टर साळकरांनी विशेष नमूद केलं. जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या पार्श्वभूमीवर डॉ. साळकरांनी गोंयकारांना ताजं आणि घरी शिजवलेल्या अन्नाचं महत्त्व पटवून देण्याची एक व्हिडिओ संदेश जारी केलाय.

हेही वाचाः लसीकरण मोहिम दिसतेय मासळी बाजारातील लिलावासारखी

मुलांना घरी शिजवलेलं अन्न खाऊ घाला

जर तुम्हाला कोविड, हृदयविकार किंवा कर्करोगासारख्या आजारांपासून स्वत:ला दूर ठेवायचं असेल, तर आहार अत्यंत महत्त्वाचा आहे. आणि एचएफएसएस (उच्च चरबी साखर आणि मीठ) असलेल्या आहारापासून स्वत:ला दूर ठेवा. सर्वसाधारणपणे त्यांना ‘जंक फूड’ म्हणतात. आज पालकांना आपल्या मुलांसाठी दररोज ताजं अन्न तयार करण्यासाठी वेळ नसतो, त्यामुळे पालक हे सर्व प्रक्रिया केलेलं अन्न मुलांना खाऊ घालतात. अशा प्रकारच्या खाद्यपदार्थांचं दीर्घकाळासाठी केलेलं सेवन मुलांसाठी हानिकारक ठरू शकतात, असं डॉ. साळकर म्हणालेत.

डॉ. साळकरांनी दिल्या 3 टिप्स

निरोगी आणि रोगमुक्त जीवन जगण्यासाठी डॉ. साळकरांनी 3 टिप्स दिल्यात.

जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल, तर निरोगी आहार घ्या. म्हणजे आपल्या आहारात कमी चरबीयुक्त पदार्थ, साखर आणि मीठ असणं महत्त्वाचं. ताज्या आणि हिरव्या पालेभाज्या, फळं यांचं भरपूर सेवन करा आणि भरपूर पाणी प्या. शक्य तितकं कमी लाल आणि प्रक्रिया केलेलं मांस घ्या. प्रक्रिया केलेलं मांस खाणाऱ्या लोकांमध्ये आतड्याचा कर्करोग सामान्य आहे.

दुसरं म्हणजे स्वतःला एक्सिव्ह ठेवा. धावणं, सायकलिंग, योगा आणि स्विमिंगसारख्या गोष्टी करा.

तिसरं म्हणजे मद्यपान आणि धुम्रपान यापासून स्वतःला दूर ठेवा.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!