डॉ. सायनेकरांचा नवा विक्रम गोव्यासाठी अत्यंत प्रेरणादायी

सदानंद शेट तानावडेः डॉ. पंकज सायनेकरांचं केलं अभिनंदन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः बांबोळी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित सूर्यनमस्कारमध्ये आतापर्यंत रेकॉर्ड करणारे डॉ. पंकज सायनेकर यांनी आपला स्वतःचा मागील रेकॉर्ड मोडला आणि 24 तासांमध्ये 3730 सूर्यनमस्कार घेऊन एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. तसेच एशिया बूक ऑफ रेकॉर्डसमध्ये आता त्याची नोंद होणार आहे. त्यांनी प्रस्थापित केलेल्या या नव्या विक्रमाबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी त्यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलंय. याविषयी तानावडेंनी ट्विट करून माहिती दिलीये.

हेही वाचाः Fire | Video | पिसुर्लेजवळ ट्रान्सफॉर्मला आग, पण वीज कर्मचारी नॉट रिचेबल

डॉ. सायनेकरांचा नवा विक्रम गोव्यासाठी अत्यंत प्रेरणादायी

१८ तास ११ मिनिटांपेक्षा जास्त वेळ सतत सूर्यनमस्काराचे ३७३० संच सादर करून नवा विश्वविक्रम स्थापित केल्याबद्दल डॉ. पंकज अरविंद सायनेकर यांचा आम्ही गौरव केला. हा उपक्रम गोव्यासाठी खूप प्रेरणादायी होता. डॉ. पंकज सायनेकर यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांना माझ्याकडून शुभेच्छा.

आंतरराष्ट्रीय योगदिनी केला विक्रम

सातव्या आंतरराष्ट्रीय योगदिनाचे औचित्य साधून पंकज सायनेकर यांनी हा नवा विक्रम प्रस्थापित करताना 2013 साली केलेला स्वतःचाच विक्रम मोडला. रविवारी सकाळी 9 ते सोमवारी योगदिनी सकाळी 9 वाजेपर्यंत 24 तासांत पंकज सायनेकर यांनी ‘ सूर्यनमस्कार घालण्याचा एक नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला. सोमवारी सकाळी झालेल्या एका छोटेखानी समारंभास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय श्रीपाद नाईक हे उपस्थित होते. एशिया बूक ऑफ रेकॉर्डसचे पदाधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते यावेळी पंकज सायनेकर यांना प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. डॉ. पॅकलीन हर्बटदास, जॅको ली रॉक्स आदी मंडळी यावेळी उपस्थित होती. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी या विक्रमाबद्दल त्याचं कौतुक केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!