18-44 वयोगटातून लसीकरणाला उत्तम प्रतिसाद

डॉ. राजेंद्र बोरकर यांची माहिती; पुढील लसीकरण योजनेवर टाकला प्रकाश

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर राज्यात लसीकरण मोहिमेने वेग पकडलाय. 18-44 वयोगटातील व्यक्तींचं लसीकरण सध्या जोरात सुरू आहे. या वयोगातील व्यक्तींकडूनही लसीकरणाला उत्तम प्रतिसाद मिळतोय. सरकारच्या पुढील लसीकरण मोहिमेवर डॉ. राजेंद्र बोरकर यांनी प्रकाश टाकताना महत्त्वाची माहिती दिलीये.

हेही वाचाः मुख्यमंत्री म्हणाले, मदतीसाठी धन्यवाद; कोलगेट पामोलिव्हचे मानले आभार

18-45 वयोगटासाठी मे महिन्यात मिळाल्या 32 हजार 870 लसी

18-45 वयोगटासाठी मे महिन्यात केंद्र सरकारकडून राज्याला 32 हजार 870 लसी मिळाल्या. हा लसींचा उपयोग आम्ही पूर्ण राज्यातून 35 सेंटर्स निवडून तिथे केला. लसीकरणासाठी आम्ही ऑनलाईन बुकिंग ओपन केलं. ही मोहिम आता शनिवारपर्यंत चालणार आहे. या 35 सेंटर्समधून 28 हजार लसी दिल्या जाणार आहेत. उरलेल्या 4 हजार लसींसाठी आम्ही प्लॅन करणार आहोत. या लसी प्रामुख्याने सरकारने जाहीर केलेल्या फ्रंटलाईन वर्कर्ससाठी वापरण्याची इच्छा असल्याचं डॉ. बोरकर म्हणाले.

हेही वाचाः राहुल द्रविडकडे टीम इंडियाचं प्रशिक्षकपद

पुढच्या टप्प्यात 18-44 वयोगाटासाठी 36 हजार 580 लसी मंजुर

18-44 वयोगाटासाठी केंद्राकडून आता 36 हजार 580 लसी मंजुर झाल्या आहेत. आता फक्त सिरम इन्स्टिट्यूटकडे चर्चा करून, लसींचं पेमेंट करून आम्हाला त्या मिळवायच्या आहेत. या लसी आल्यावर त्या गोंयकारांना देण्यासाठी आम्हाला पुन्हा स्लॉट ओपन करण्यासाठी बुकिंग खुलं करावं लागणार आहे. यात थोडा वेळ लागू शकतो, असं डॉ. बोरकरांनी सांगितलं.

हेही वाचाः Weight loss: वर्क फ्रॉम होम करून वजन वाढलंय? काळजीचं कारण नाही, हे करा…

आता कॅन्सल करता येणार बुकिंग

मागच्या दिवसांत बऱ्याचदा असं झालंय की स्लॉट बुक करून वादळामुळे किंवा कोविड पॉझिटिव्ह झाल्यामुळे लोकांना लसीकरणासाठी येता आलेलं नाही. पूर्वी आम्ही अशा केसमध्ये दुसऱ्या दिवशीची अपॉईंटमेंट देऊन त्या व्यक्तीचं लसीकरण करायचो. मात्र आता ही सिस्टम आम्ही थांबवणार आहोत. आता स्लॉट बुक केलेल्या दिवशी व्यक्ती आली नाही, तर तिला पुन्हा स्लॉट बुक करावा लागणार आहे. गोंयकारांना विनंती आहे की स्लॉट बुक केलेल्या दिवशी जर त्यांना यायला जमलं नाही, तर त्यांनी सरळ अपॉईंटमेंट कॅन्सल करावी. जेणेकरून पोर्टलवर 1 स्लॉट अव्हेलेबल दिसेल आणि दुसऱ्या व्यक्तीला त्याचा उपयोग करून घेता येईल. हे सकाळी 9 पूर्वी करावं लागेल, अशी माहिती डॉ. बोरकरांनी दिली.

हेही वाचाः शेतकरी, रिक्षा, टॅक्सीचालकांसाठी कर्नाटकचं १२५० कोटींचं ‘कोविड रिलीफ पॅकेज’

उत्तम प्रतिसाद

18-44 या वयोगटातून लसीकरणासाठी खूप चांगला प्रतिसाद मिळतोय. आम्ही लस घेण्यासाठी कधी येऊ शकतो असं लोक विचारतायत. वादळाच्या दिवसात लसीकरणात थोडा खंड पडला. पण 18-44 वयोगटातला 20 हजार लोकांचं लसीकरण आम्ही करू शकलोय. अजून स्लॉट ओपन केले असते तर अजून लोक आले असते, असं डॉ. बोरकर म्हणाले.

हेही वाचाः ब्लॅक फंगसचा वाढता धोका, एम्सकडून गाईडलाईन्स जारी

आता दुसरी लस 3 महिन्यांनी

14 मे पूर्वी आम्ही लस दिलेल्यांना 6 आठवड्यांनंतर यायला सांगायचो. मात्र आता केंद्राने लसीकरणासाठीच्या नियमांमध्ये बदल केलेत. आता कोविड प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस 12 आठवड्यानंतर मिळणार आहे. कोविड लसीवरील एक्सपर्ट कमिटीने सांगितल्यानुसार 12 आठवड्यांच्या कालावधीनंतर दुसरा डोस घेतलास प्रतिसाद उत्तम मिळतो. त्यामुळे सरकारने आता पोर्टलवर तसे बदल केलेत. हा मेसेज प्रत्येकापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही प्रिंट मीडिया, सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडियाची मद घेतली आहे. तसंच गोंयकारांना विनंती आहे की त्यांनीदेखील याविषयी जागृती करावी, असं आवाहन डॉ. बोरकरांनी केलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!