डॉ. प्रमोद सावंतजी, तुम्ही या गोमंतभूमीचे खरे पुत्र

सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामी: ट्विट करत मुख्यमंत्र्यांचं केलं अभिनंदन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः गोमंतकीय संस्कृती टिकवून ठेवण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचे कार्य नव्या पिढीला माहीत व्हावं या करता राज्य सरकारच्या वतीने गोव्यात शिवराज्याभिषेक दिन सोहळा थाटात पार पडला. छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पुढच्या पिढीला माहिती व्हावं, या करिता बहुभाषिक शॉर्ट फिल्मचं प्रकाशन करून मुख्यमंत्र्यांनी त्याचं लोकार्पण केलं. मुख्यमंत्र्यांच्या या अनोख्या उपक्रमाबद्दल सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींनी ट्विट करून त्यांचं अभिनंद केलं.

सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचं ट्विट

शिवराज्याभिषेक दिन सोहळा राज्यात थाटात साजरा केल्याबद्दल तसंच छत्रपतींचं कार्य आजच्या युवा पिढीला माहिती व्हावं म्हणून मुख्यमंत्र्यांनी बहुभाषिक शॉर्ट फिल्मचं केलेलं प्रकाशन आणि लोकार्पण, याबद्दल सदगुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजींचं ट्विट करून मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन केलंय. ट्विट करताना स्वामीजी म्हणालेत, डॉ. प्रमोद सावंतजी. तुम्ही या गोमंतभूमीचे खरे पुत्र आहात. कित्येक वर्षांनंतर एका राष्ट्रवादी मुख्यमंत्र्यांनी गोव्याच्या खऱ्या इतिहासाचं दर्शन घडविण्याचं धाडस केलं आहे. हा लघुपट इतरही भाषांमधून व्हायरल होऊ द्या.

राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

रविवारी 6 जून रोजी शिवराज्याभिषेक दिनानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यात सरकारकडून विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंतांनी सकाळी साखळी येथे छत्रपतींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाची घटना असून, खऱ्या अर्थाने ती स्वराज्याची सुरुवात होती.

बहुभाषिक शॉर्ट फिल्मचं लोकार्पण

छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य पुढच्या पिढीला माहित व्हावं, या करिता बहुभाषिक शॉर्ट फिल्मचं प्रकाशन करून लोकार्पण करण्यात आलं. पोर्तुगिजांच्या साडेचारशे वर्षाच्या जुलमी राजवटीत छत्रपतींचं योगदान झाकलं गेलं होतं. हे नव्या पिढीला माहीत व्हावं आणि त्याला उजाळा द्यावा, यासाठी यापुढे राज्यात सर्वत्र हा दिवस साजरा करण्यात येईल, असं मुख्यमंत्री म्हणाले.

हा व्हिडिओ पहाः शिवराज्याभिषेक दिन विशेष । मुख्यमंत्र्यांचा छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!