डॉ. प्रकाशचंद्र पु. शिरोडकर कालवश

बंगळुरु येथे निधन; राज्य पुरातत्व, पुराभिलेख आणि वास्तूसंग्रहालयाचे माजी संचालक म्हणून दोन तप काम

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक तथा गोव्याचे पहिले सभापती पांडुरंग पुरूषोत्तम शिरोडकर यांचे ज्येष्ठ पुत्र डॉ. प्रकाशचंद्र पांडुरंग शिरोडकर यांचं बंगळुरु येथे निधन झालं. राज्य पुरातत्व, पुराभिलेख आणि वास्तूसंग्रहालयाचे माजी संचालक म्हणून दोन तप त्यांनी काम केलं. त्यांचं यात फार मोठं योगदान आहे.

हेही वाचाः माजी केंद्रीय मंत्री अजित सिंह यांचं कोरोनामुळं निधन

डॉ. प्रकाशचंद्र पांडुरंग शिरोडकरांची कारकीर्द

डॉ. प्रकाशचंद्र पांडुरंग शिरोडकर यांनी गोवा गॅजेटीअरचे कार्यकारी संपादक म्हणून 20 वर्षे त्यांनी धुरा सांभाळली. गोमंतकीय इतिहास तसंच पुरातत्व खात्यात संशोधनाचं मोठं काम त्यांनी केलं आहे. पुराभिलेख- पुरातत्व या संशोधनपर जर्नलमध्ये त्यांनी विपूल लेखन करून गोमंतकीय इतिहासासंबंधीची महत्त्वपूर्ण माहिती दिलीए.

हेही वाचाः माजी आमदार विनायक नाईक यांचं निधन

गोव्याच्या इतिहासावर आणि स्वातंत्र्यलढ्यावर विपूल लेखन

1993 साली त्यांनीच उसगामळ येथे कुशावती नदीच्या किनारी कातळशिल्पाचा पहिला शोध लावला. या शिल्पावरून गोमंतभूमीच्या मूळ संस्कृतीचा शोध लावण्यासंबंधीचं लिखाणही त्यांनी केलं. त्यांनी इतिहासावर तसंच गोव्याच्या स्वातंत्र्यलढ्यावर विपूल असं लेखन केलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!