लॉकडाऊनच्या अफवांना बळी पडू नका : मुख्यमंत्री

गेल्या चोवीस तासांत करोनाचे १०० रुग्ण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढत चाललीये. सरकार करोना स्थितीवर नियंत्रण ठेवून आहे. मात्र, करोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे गोमंतकीय जनतेने गर्दी टाळावी. शारीरिक अंतर, मास्क, सॅनिटायझर आदींचा वापर करावा. तसंच लॉकडाऊनच्या अफवांना बळी पडू नये, असं आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोशल मीडियाद्वारे केलंय.

हेही वाचाः CRIME | आरोग्यमंत्र्यांच्या नावे बनवेगिरी करणारा गजाआड

राज्यात करोनाच्या सक्रिय रुग्णांच्या संख्येत वाढ

दरम्यान, राज्यात करोनाच्या सक्रिय रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. गेल्या चोवीस तासांत हा आकडा ५६ हून अधिक झाला आहे. शुक्रवारी एकाच दिवसांत १०० रुग्ण आढळले. गुरुवारी सक्रिय रुग्णांची संख्या ५३१ होती ती वाढून शुक्रवारी ५८७ झाली. दिवसभरात १०० रुग्ण मिळण्याची फेब्रुवारीमधील ही पहिलीच घटना आहे. शुक्रवारी करोनामुळे आणखी तिघेजण दगावले. त्यामुळे करोना बळींचा आकडा ७९४ वर पोहोचला आहे. अलीकडच्या काळात राज्यात एखाद दुसऱ्या रुग्णांचा बळी जात असल्याच्या घटना घडत आहेत. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांचा आकडाही वाढत आहे. मडगावात ६९ रुग्ण आहेत. गुरुवारी मडगावातील रुग्णांचा आकडा ५६ होता. कांदोळी ४९, चिंबल ४७, पणजी ४५ रुग्ण आहेत. करोनाच्या चाचण्या वाढल्यानंतर रुग्णांच्याही संख्येत वाढ होते. शुक्रवारी १,८१३ चाचण्या घेण्यात आल्या. त्यानंतर करोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली.

गोव्यातही रुग्णांच्या संख्येत वाढ

महाराष्ट्रातही रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे आता गोव्यातही रुग्ण वाढू लागले आहेत. राज्यात आतापर्यंत करोनाचे ५४,८७१ रुग्ण सापडले. त्यापैकी ५३,४९० रुग्ण बरे झाले. तसेच आतापर्यंत करोनाच्या ४,९०,५५५ चाचण्या झाल्या आहेत.

हेही वाचाः बापरे! कोरोनाचे आणखी 2 नवे विषाणू भारतात सापडले- आरोग्य मंत्रालय

हेही वाचाः गोव्यातून सिंधुदुर्गात जाताय? कोरोना चाचणी करावी लागणार

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!