शेतकऱ्यांसोबत राजकारण करू नका

आमदार दयानंद सोपटेंचं विरोधकांना इशारा

मकबूल | प्रतिनिधी

पेडणेः आमदार दयानंद सोपटेंनी मांद्रेतील शेतकऱ्यांना शेती नांगरणीसाठी बुधवारी ट्रक्टर उपलब्ध करून दिले. त्यामुळे शेतीच्या नांगरणीला सुरुवात करण्यत आली. यावेळी आमदार दयानंद सोपटे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून शेती नांगरणीच्या कामाला सुरुवात करण्यात आली. या कार्यक्रमात आमदार दयानंद सोपटे तसंच स्थानिक नागरिक सुनील आसोलकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. आमदार दयानंद सोपटेंनी सध्या दोन ट्रक्टर उपलब्ध करून दिलेत आणि एक ट्रक्टर लवकरच उपलब्ध करू देणार असल्याचं यावेळी सांगितलं.

शेतकऱ्यांसोबत राजकारण करू नका

कृषी खात्याचे मंत्री बाबू कवळेकर यांनी शेतकऱ्यांना प्राधान्य देऊन त्यांना पुढे आणण्यासाठी नवीन योजना सुरू केल्या आहेत. सर्व सुविधा, खतं असं मिळून 90 टक्के सबसिडी देण्याचं आव्हान केलं आहे. ज्या काही योजना आहेत त्या मांद्रेतील शेतकऱ्यांपर्यंत घेऊन येण्याचं काम मी करणार आणि मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची सहकार्य भरपूर मिळतंय. त्यामुळे मी मांद्रे मतदारसंघात अनेक विकास कामं होत आहेत. तोंडाने कृषीप्रधान देश किंवा राज्य म्हणणं खूप सोपं आहे. प्रत्येक शेतकऱ्याला शेती लागवड करण्यासाठी प्रवृत्त करण्याची गरज आहे. मांद्रे मतदार संघात ज्या गावत जास्त शेतकरी आहेत आणि शेती पडीक होती, ती शेती पुन्हा फुलावी या हेतूने गेल्या वर्षापासून पावसाळ्यात वायंगणी शेतासाठी मी बियाणी आणि खतं पुरवलीत. मला भेदभाव करायचा नाही आहे. शेतकऱ्यांबरोबर राजकारण करू नये. मी अजूनपर्यंत तसं केलेलं नाही आणि करणारही नाही, असं सोपटे म्हणाले.

शेतकऱ्यांकडे राजकारण करू नये

गेल्या वर्षी मांद्रे मतदारसंघातील ८ पंचायतीतील २०५० शेतकरी होते. यावर्षी २८५० शेतकरी शेती करतायत. जवजवळ ८०० शतकरी नवीन तयार झालेत हे सांगताना खूप बरं वाटतंय. आज गोंयकार शेती करण्यासाठी पुढे येतायत. त्यांनी असंच पुढे यावं. त्यांना जी काही मदत लागेल ती मी पुरवेन, लागेल ते सहकार्य करण्यासाठी मी तयार आहे. गेल्यावर्षी शेतकऱ्यांना बियाणी आणि खत दिलं. यापुढेही देणार. ज्याप्रमाणे तुम्ही आतापर्यंत साथ दिलीत, यापुढेही तुमची साथ मिळेल अशी आशा आहे. गावातील ग्रामदैवत आणि लोकांच्या सहकार्याने मी दुसऱ्यांदा आमदार बनू शकलो, असे सोपटे म्हणाले.

मांद्रे मतदारसंघ हरित करूया

आज खूप बरं वाटतं की आमदारांनी गरजेच्या वेळी ट्रॅक्टर उपलब्ध करून दिले. यापूर्वी आम्हाला खूप त्रास व्हायचे. बैलांना जोत बांधून शेताची नांगरणी करावी लागे. सुताराला सोधावं लागे. आमदार सोपटेंमुळे ते त्रास आत कमी झाले. आमदार सोपटेंना शेतकऱ्यांची खूप काळजी आहे आणि ते स्वतः शेतकरी असल्याने त्यांना शेतकऱ्यांविषयी एक तळमळ आहे. म्हणून त्यांनी शेतकऱ्यांना बियाणी, खत मोफत दिली. आमदार सोपटेंच्या पाठबळावर चला शेती करूया आणि मांद्रे मतदारसंघ हरित करूया, असं आवाहन स्थनिक सुनील आसोलकरांनी केलं.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!