कणकवलीत झालं, करमळीत केव्हा होणार?

वाढत्या कोरोनामुळे चिंताजनक स्थिती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : राज्यात कोरोना रुग्णवाढीची चिंता आरोग्य यंत्रणेसमोरची आव्हानं वाढते आहे. अशातच गोव्याशेजारील महाराष्ट्रात कोणत्याही क्षणी लॉकडाऊनची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जाते आहे. महाविकास आघाडी सरकारकडून त्याच प्रमाणं पावलंही उचलायला सुरुवात केली आहे. दरम्यान, महाराष्ट्रात विकेंड लॉकडाऊन महत्त्वाच्या शहरांमध्ये चांगला प्रतिसाद पाहायला मिळाला. तर दुसरीकडे गोव्याला लागूनच असलेल्या महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातही कोरोनाला रोखण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

हेही वाचा – सिंधुदुर्ग जिल्ह्यात बाहेरून येणाऱ्यांची होणार तपासणी?

लॉकडाऊनच्या भीतीनं गावाकडे धाव

महाराष्ट्रातील वाढती रुग्णसंख्या सगळ्यांनाच चिंता करायला लावणारी आहे. महाराष्ट्र सरकारनंही कोरोनाला रोखण्यासाठी महत्त्वाची पावलं उचलायचा सुरुवात केली आहे. अशातच कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर कोकणातील रेल्वे स्थानकांवर आता प्रवाशांची तपासणी सुरु करण्यात आली आहे.

हेही वाचा – ब्रेकिंग | राज्यात पुन्हा ५००पेक्षा जास्त नव्या रुग्णांचं २४ तासांत निदान

कणकवली रेल्वे स्थानकावर गर्दी

मागील काही दिवस कणकवली रेल्वेस्थानकावर आरोग्य यंत्रणेकडून कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी तपासणी करणे बंद केले होते. पण आज वीकेण्डच्या कडक लॉगडाऊनच्या दरम्यान रेल्वे स्थानकावर कोणतीही तपासणी होत नसल्याचे वृत्त सिंधुदुर्ग लाईव्हने प्रसारित केलं. त्यानंतर दुपारच्या सत्रात लगेच प्रशासनाला जाग आली आणि आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली. अखेर कणकवली रेल्वे स्थानकावर येऊन कणकवलीत उतरणार्‍या प्रवाशांची तपासणी करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

हेही वाचा – काय चाललंय काय? एप्रिलातही पाऊस पडण्याची शक्यता?

यामध्ये आलेल्या प्रवाशांचे टेंपरेचर आणि ओक्सीमीटरच्या माध्यमातून तपासणी करण्यात येत असल्याचे दिसून आलं. यावेळी आरोग्य विभागाचे आचरेकर, कदम, आरोग्य सेवक साळुंखे , भाट या तपासणी दरम्यान उपस्थित होत्या. दरम्यान, कणकवलीत ज्याप्रमाणे रेल्वे प्रवाशांची तपासणी केली जाते आहे, त्याचप्रमाणे राज्यातील रेल्वे स्थानकांवर प्रवाशांची तपासणी होते आहे का, याबाबत शंका आहे.

हेही वाचा – Corona Update | आश्चर्य! पोलिसाने थेट पंतप्रधानांनाच ठोठावला दंड!

कणकवली रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांची तपासणी अखेर सुरु झाली. पण आता कणकवलीप्रमाणेच करमली रेल्वे स्थानकातील प्रवाशांची तपासणी केव्हा सुरु होणार, हा प्रश्न कायम आहे. गोव्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच एन्ट्री पॉईन्टवर थर्मल स्क्रिनिंग आणि तपासमी होण्याची गरज व्यक्त केली जाते आहे. रेल्वे आणि विमानानं प्रवास करणाऱ्या सर्वांचीच तपासणी केली जावी, असे प्रशासनाचे निर्देश आहेत. मात्र त्यांचं पालन कितपत होतंय, यावर शंका घेतली जाते आहे.

हेही वाचा – अंधश्रद्धेचा कहर! जन्मदात्यांनी महिन्याचे मूल मंदिराला केले दान

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!