शिवोलीतील डॉम्निक डिसोझाला अटक, ‘हे’ आहे कारण…

म्हापसा पोलिसांची कारवाई; फाईव्ह पिलर चर्चमधून केले अटक

Goan Varta Live | प्रतिनिधी

म्हापसा : आजारातून बरे करण्याचे आमिष दाखवून बळजबरी धर्मांतरण केल्याप्रकरणी एका संशयिताला अटक करण्यात आली आहे. संशयिताला गुरुवारी रात्री उशिरा म्हापसा पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर रितसर अटक केली. अटकेनंतर लगेच संशयित आजारी पडल्याने त्याला येथील जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे.
हेही वाचाःधक्कादायक : कराटे प्रशिक्षकाकडून ११ वर्षीय मुलीचा विनयभंग…

गोव्यातील पहिली अटक

काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी धर्मांतराविरोधात इशारा दिला होता. राज्यात धर्मांतराचे प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असे त्यांनी जाहीरपणे स्पष्ट केले होते. त्यानुसार धर्मांतराविरोधात तक्रार दाखल होताच डॉम्निकला अटक करण्यात आली आहे. अशाप्रकारे ही गोव्यातील पहिलीच अटक ठरली आहे.
हेही वाचाःअपघातग्रस्त कारची चाके चोरीला…

पत्नी, इतर सहकर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

दरम्यान सड्ये-शिवोली येथील फाईव्ह पिलर चर्चचा धर्मगुरू तथा स्वयंघोषित गॉड मॅन डॉम्निक डिसोझा याला म्हापसा पोलिसांनी गुरुवारी रात्री अटक केली. विशेष म्हणजे, अटकेनंतर लगेच तो आजारी पडल्याने त्याला येथील जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्याविरुद्ध पोलिसांनी वेगवेगळ्या प्रकरणात दोन गुन्हे नोंदविले आहेत. प्रकाश कृष्णा खोब्रेकर (कुचेली-म्हापसा) आणि निखिल शेट्ये (खोर्ली-म्हापसा) यांनी बुधवारी म्हापसा पोलिसांत लेखी तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीत डॉम्निक डिसोझा, त्यांची पत्नी जुआन मास्कारेन्स आणि त्यांच्या इतर सहकर्‍यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली होती. तक्रारीला अनुसरून गुरुवारी डॉम्निक याला अटक करण्यात आली.
हेही वाचाःराज्यातील १७ उपअधीक्षकांसह ३२ जणांच्या बदल्या…

बळजबरी धर्मांतर करण्यासाठी त्याने दबाव आणला

संशयित डॉम्निक याने आपल्याला आजारपणातून बरे करण्याचे आमिष दाखविले. त्या बदलात बळजबरी धर्मांतर करण्यासाठी त्याने दबाव आणला. धर्मांतराला विरोध केल्यानंतर आपल्याला धमकी दिली आणि संशयितांनी आपल्या धार्मिक भावना दुखावल्या, असे फिर्यादींनी तक्रारीत नमूद केले आहे. या तक्रारीच्या आधारे म्हापसा पोलिसांनी संशयितांविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १५३ अ, २९५ अ, ५०६ (२) तसेच जादूटोणा प्रतिबंधकच्या कलम ३ व ४ नुसार गुन्हा नोंदविला. या गुन्ह्याखाली संशयित डॉम्निक डिसोझा याला गुरुवारी रात्री उशिरा पोलिसांनी ताब्यात घेतले व नंतर रितसर अटक केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गौरव नाईक करीत आहेत.
हेही वाचा:ओबीसींचे होणार नव्याने सर्वेक्षण, ‘हे’ आहे कारण…

इस्पितळात जाऊन स्वतःची बायपास सर्जरी केली

संशयित हा जादूटोणा करून आजारपणातून मुक्त करण्याचे आमिष दाखवत होता. इतरांवर उपचार करण्याचा दावा करत होता. अगदी असाध्य रोगही दैवी शक्तीने बरे करण्याचा तो दावा करतो. पण, स्वतः मात्र इस्पितळात जाऊन उपचार घेतो. काही महिन्यांपूर्वीच डॉम्निक याने इस्पितळात जाऊन स्वतःची बायपास सर्जरी केली होती.
हेही वाचाःहळदी समारंभाला गेलेल्या कुटुंबाचा फोडला फ्लॅट!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!