खबरदार! पुन्हा हल्ला कराल तर हॉस्पिटल सोडून निघून जाऊ, डॉक्टरांची सटकली

निवासी डॉक्टरांचा रूग्णांच्या नातेवाईकांना इशारा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यात कोरोनाच्या या काळात सीमेवरील सैनिकाप्रमाणेच इथले डॉक्टर, नर्सेस तथा इतर वैद्यकीय कर्मचारी आपली सेवा बजावत आहेत. आरोग्य यंत्रणांच्या मर्यादा असूनही आपला जीव धोक्यात घालून आणि आपले सर्वस्व पणाला लावून हे सगळे लोकांचा जीव वाचवण्यासाठी धडपडताहेत. एवढे करून रूग्ण दगावल्यानंतर भावनेच्या भरात मृतांच्या नातेवाईकांकडून थेट डॉक्टरांवर हल्ले करणे तसेच त्यांना सर्वांसमोर अपशब्द करून अपमानीत करण्याचे प्रकार वाढले आहेत. अलिकडेच झालेल्या दोन घटनानंतर निवासी डॉक्टरांनी ह्याची गंभीर दखल घेतलीए. हे प्रकार असेच सुरू राहीले तर सध्या कोविड-१९ च्या उपचारांसाठी अहोरात्र सेवा बजावणारे सुमारे ३०० डॉक्टर माघार घेतील, असा इशारा त्यांनी दिलाए.

गोवा निवासी डॉक्टर्स संघटना(गार्ड) यांनी जारी केलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आलीएय. सध्या निवासी डॉक्टरांना गोवा वैद्यकीय महाविद्यालय, ईएसआय, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळ, फोंडा उपजिल्हा इस्पितळ आदी ठिकाणी सेवेसाठी पाठविण्यात आलंय. मुळातच वाढत्या कोरोना प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर वेगवेगळ्या इस्पितळांत सुविधांचा अभाव मोठ्या प्रमाणात आहे. तरीही डॉक्टर्स आपल्या प्रयत्नांची शिकस्त करून रूग्णांचे जीव वाचवण्यासाठी प्रयत्न करताहेत. 18 एप्रिल 2021 रोजी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात एक रूग्ण दगावला आणि त्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी तेथील ड्यूटीवर असलेल्या डॉक्टरांशी अत्यंत असभ्य असे वर्तन करून त्यांना अपमानीत केले. 28 एप्रिल 2021 रोजी असाच एक प्रकार जीएमसीमध्ये झाला. तिथे तर रूग्णाच्या नातेवाईकांनी व्हेंटीलेटर तोडून टाकला.

मुळात हे बहुतांश डॉक्टर हे पदव्यूत्तर शिक्षण घेत आहेत. अशा आपत्कालीन परिस्थितीत त्यांना रूग्ण सेवेसाठी पाठविण्यात येते. एखाद्या डॉक्टर प्रोफेशनात अशा संकट प्रसंगी सेवा देण्याची संधी मिळणं हे खूप मोठं काम आहे. शेवटी डॉक्टर, नर्सेस ही सुद्धा माणसंच आहेत. ज्या लोकांच्या सेवेसाठी अहोरात्र काम करतो तेच लोक अशे वागतात हे पाहून खूप वाईट वाटतं,असं या संघटनेनं आपल्या पत्रकात म्हटलंय. शेवटी प्रत्येकाची सुरक्षा महत्वाची आहे. या परिस्थितीत या डॉक्टर, नर्सेस यांची कुटुंबे सुद्धा मोठं योगदान दित आहेत. या संकटात त्यांना सेवा बजावण्यास धीर देत आहेत. हेच लोक जर असुरक्षित बनतील तर ते त्यांना का म्हणून पाठवणार,असा प्रश्न त्यांनी केलाए.

अन्यथा माघार घेणार

डॉक्टर किंवा अन्य वैद्यकीय सेवा कर्मचाऱ्यांवर अशाच पद्धतीचे हल्ले झाले तर सेवेतून माघार घेणं भाग पडेल,असा इशारा या संघटनेने दिलाय. सुमारे 300 डॉक्टर सध्या सेवा बजावत आहेत. या डॉक्टरांनी सेवेतून माघार घेतल्यास तो मोठा आत्मघात ठरू शकतो आणि त्यामुळे आता सरकारलाही या निवासी डॉक्टरांच्या सुरक्षेबाबत कडक उपाययोजना आखणे गरजेचं झालं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!