विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन करा; लस घेण्यासाठी विद्यार्थी खूप लहान

प्रतिमा कुतिन्होः रोझरी उच्च माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी केला हस्तक्षेप; विद्यार्थ्यांचं लसीकरण न करण्याची मुख्यमंत्र्यांना केली विनंती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः विद्यार्थ्यांच्या परीक्षा ऑनलाईन करा; लस घेण्यासाठी विद्यार्थी खूप लहान असल्याचं ‘आप’च्या गोवा उपाध्यक्ष प्रतिमा कुतीन्हो म्हणाल्यात. विद्यार्थ्यांच्या ऑफलाईन परीक्षा घेण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयावर कुतिन्हो यांनी हस्तक्षेप घेतला आहे.

हेही वाचाः बहुजन समाज नेते मनोज कुमार घाडी ‘आप’मध्ये सामील

नावेलीतील रोझरी उच्च माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या ऑनलाईन परीक्षांचं ऑफलाइन परीक्षेत रूपांतर झालं, तेव्हा विद्यार्थ्यांना धक्का बसला. शालेय अधिकाऱ्यांनी दावा केला, की सरकारने ऑफलाइन परीक्षांना परवानगी दिली आहे. विद्यार्थ्यांनी यात हस्तक्षेपासाठी ‘आप’च्या गोवा उपाध्यक्ष प्रतिमा कुतीन्हो यांच्याशी संपर्क साधला.

विद्यार्थ्यांना त्यांचा जीव धोक्यात घालायला सांगू नका

एड. प्रतिमा कुतिन्हो विद्यार्थ्यांच्या बाजूने उभ्या राहिल्या आणि त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याकडे त्वरित हस्तक्षेप करण्याची विनंती केली. कुतीन्हो म्हणाल्या, विद्यार्थ्यांंचं लसीकरण केलं गेलं नाही. त्यामुळे त्यांना त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा जीव धोक्यात घालण्यास सांगणं चुकीचं आहे.

हेही वाचाः म्हापशात गाळेवजा दुकान फोडले; दोघांना अटक

मला विद्यार्थ्यांच्या आरोग्याची चिंता

कुतीन्हो म्हणाल्या, मी परीक्षेच्या विरोधात नाहीत. परंतु 18 वर्षांपेक्षा कमी वयाच्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी चिंतेत आहेत. 18 वर्षांखालील मुलांना लसीकरण करण्यासाठी कोणतीही पावलं उचलली गेली नसल्यानं तरुण विद्यार्थ्यांना आरोग्याचा धोका आहे. २ आठवड्यांपूर्वी विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली होती, की परीक्षा ऑनलाईन होतील आणि मग अचानक परीक्षेच्या ३ दिवस आधी त्यांना सांगितलं गेलं, की त्यांना प्रत्यक्षात उपस्थित राहावं लागेल.

हेही वाचाः खोर्ली येथे महिलेचा विनयभंग

विद्यार्थ्यांच्या भल्यासाठी परीक्षा ऑनलाईन घ्या

१८ वर्षांखालील विद्यार्थ्यांना ऑफलाइन परीक्षेत भाग घेण्याबाबत कोणतेही परिपत्रक नसल्यानं मी शिक्षण मंत्री असलेल्या मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विनंती करते, की या विद्यार्थ्यांच्या चांगल्यासाठी त्यांनी परीक्षा ऑनलाईन घ्याव्यात, असं कुतिन्हो म्हणाल्यात.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | SUSPENSE | स्कार्लेट प्रकरणाच्या स्मृती ताज्या

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!