लग्नानंतर लगेच घटस्फोट होण्याच्या प्रकारात वाढ! महिन्याला सरासरी 30 घटस्फोट

राज्यात घटस्फोटांचं प्रमाण लक्षणीय!

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : राज्यातील घटस्फोट होण्याच्या प्रकारांत वाढ झाल्याचं दोन दिवसांपूर्वी कायदामंत्री नीलेश काब्राल यांनी म्हटलं होतं. दरम्यान, राज्यातील घटस्फोटांच्या प्रकारांची जी आकडेवारी समोर आली आहे, ती धक्कादायक आणि काळजी करायला लावणारी आहे.

लग्न झाल्यानंतर लगेच काही महिन्यांमध्ये घटस्फोट होण्याच्या प्रकारांत वाढ होत आहे. गोव्यात गेल्या सतरा महिन्यांमध्ये 423 घटस्फोटांची नोंद झाली आहे. अर्थात महिन्याला सुमारे 25 घटस्फोट होत आहेत.

काऊन्सिंलिंगचा पर्याय!

गोव्यात सध्यातरी कौटुंबिक न्यायालय नाही त्यामुळे अशा प्रकारचे सर्व घटले दिवाणी न्यायालयात वर्ग होतात. गोव्यात अशा खटल्यांसाठी समुपदेशनाची मोठी उणीव आहे. घटस्फोटांचे खटलेही मोठ्या प्रमाणात प्रलंबित राहतात. अशा स्थितीत आता गोव्याच्या राज्य निबंधक आणि नोटरी प्रमुख खात्याने लग्नापूर्वीच्या दोन्ही सह्या व्हायच्या पूर्वी मधल्या कालावधीत वधू -वराचे समुपदेशन करण्याची योजना आखली आहे.

हेही वाचा : बेकायदा घरांना घरपट्टी लागू करण्यासह ती कायदेशीर करावी

कुठे किती घटस्फोट?

सर्वाधिक जास्त घटस्फोट सासष्टी तालुक्यात नोंद आहेत. 2020 मध्ये सासष्टीत 96 तर गेल्या पाच महिन्यांमध्ये 25 घटस्फोट नोंद झाले आहेत. मुरगाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. मुरगावात गेल्या वर्षी 45 घटस्फोट नोंद आहेत. तिसऱ्या क्रमांकावर बार्देस तालुका आहे. बार्देसमद्ये 2020 मध्ये 42 घटस्फोटांची नोंद आहे.

विभक्त होण्याची प्रकरणे राजपत्रात प्रसिद्ध होतात. ती संख्या पाहिली तर हा विषय अधीक गंभीर होत चालला आहे असेच दिसून येते. योग्यवेळी जोडप्यांचे समुपदेशन झाल्यास घटस्फोटांचे प्रमाण कमी होऊ शकते असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा : स्तनदा मातांना ‘वर्क फ्रॉम होम’ सुविधा द्या ; केंद्राची सूचना

फोंडा, तिसवाडी, डिचोली, सत्तरी, केपे हे तालुके घटस्फोटांच्या बाबतीत तिसऱ्या ते सातव्या क्रमांकावर आहेत. फोंड्यात 2020 साली 29 तर यावर्षी मेपक्यंत 14 घटस्फोट नोंद आहेत. तिसवाडीत 2020 मध्ये 26 आणि 2021 मध्ये मे पर्यंत 10, केपे तालुक्यात गेल्यावर्षी 19 तर यंदा पाच महिन्यांमध्ये 11, डिचोली तालुक्यात गेल्यावर्षी 21 घटस्फोट झाले यंदा तसेच सत्तरीत गेल्यावर्षी 13 आणि यंदा मेपर्यंत 5 घटस्फोट आहेत. पेडणे, काणकोण, सांगे आणि धारबांदोडा तालुक्यांमध्ये सर्वाधिक कमी घटस्फोट नोंद आहेत.

हेही वाचा : शापोरा नदीतील ‘त्या’ जेटीला आगरवाडा – चोपडेवासियांचाही विरोध

लॉकडाऊनमुळे घटस्फोट वाढले?

गेल्या वर्षी अर्थात २०२० मध्ये जानेवारीत ४३, फेब्रुवारीत २९ तर मार्चमध्ये २५ घटस्फोट झालेत. त्यानंतर एप्रिलमध्ये ७, मेमध्ये १२ तर जूनमध्ये १६ घटस्फोट झालेत. जुलैमद्ये २७ घटस्फोटांची नोंद आहे. ऑगस्टमध्ये १९, सप्टेंबरमध्ये २९, ऑक्टोबरमध्ये ३२, नोव्हेंबरमध्ये ३४ तर डिसेंबरमध्ये ४२ घटस्फोट झाले आहे.

तर २०२१मध्ये जानेवारील २४, फेब्रुवारील ३२, मार्चमध्ये २७, एप्रिलमध्ये २४ तर मेमध्ये २ घटस्फोटांची नोंद आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!