उपमुख्यमंत्री बाबू कवळेकरांकडून केपे मतदारसंघात चेनसॉ यंत्रांचे वितरण

एकूण 10 चेनसॉ यंत्रे दिली; 8 पंचायतींना 1, तर केपे नगरपालिकेला 2 यंत्रे

Goan Varta Live | प्रतिनिधी

केपेः उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कवळेकरांनी केपे मतदारसंघातील सर्व पंचायतींना आणि नगरपालिकेला मिळून झाडे कापण्यासाठी 10 चेनसॉ यंत्रे प्रदान केली. फातर्पा-किटल, बार्शे,  मोरपिर्ला, बेतूल, आंबावली, बेतूल, बाळ्ळी, अवेडे, खोला या 8 पंचायतींना प्रत्येकी एक, तर केपे नगरपालिकेला 2 चेनसॉ यंत्र उपमुख्यमंत्री चंद्रकांत (बाबू) कावळेकरांनी स्वखर्चाने प्रदान केली.

हेही वाचाः CRIME | गांजा बाळगल्याप्रकरणी पेडणे पोलिसांकडून एकाला अटक

मान्यवरांची उपस्थिती

यावेळी उपमुख्यमंत्र्यांसोबत झेडपी फातर्पा खुशाली वेळीप, झेडपी खोला शाणू वेळीप, झेडपी गीरडोलि संजना वेळीप, झेडपी शेल्डे सिद्धार्थ गावस देसाई, फातर्पा-किटल पंच सदस्य शितल नाईक आणि मेदिनी नाईक, खोलाचे उपसरपंच पंढरी प्रभुदेसाई, मोरपिर्ला सरपंच प्रकाश वेळीप, बाळ्ळी सरपंच दीपाली फळदेसाई, आंबावली सरपंच जॅसींता डायस, अवेडे सरपंच अलेलुइया आल्फोन्सो आणि केपे नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर, नगरसेवक अमोल काणेकर, प्रसाद फळदेसाई, विल्यम फर्नांडिस, भाजपा केपे मंडळाचे जनरल सेक्रेटरी खुशाली वेळीप, केपे मंडळाचे अध्यक्ष संजय वेळीप उपस्थित होते.

हेही वाचाः पर्यावरण रक्षणार्थ गोवा वन खात्याचं योगदान मोलाचं

हे माझं कर्तव्य

किनारपट्टीचे राज्य म्हणून आम्ही कोविडशी लढताना आणि चक्रीवादळ तौक्तेला सामोरे गेल्यानंतर बऱ्याच गोष्टी शिकलो. संकटात फक्त शासकीय यंत्रणाच नव्हे तर जनतेचं सहकार्य कामी येतं. लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या मतदारसंघाला पुढच्या संकटांना सामोरं जाण्यासाठी तयार करणं माझं कर्तव्य होतं. येणारा पावसाळा आणि होणारी पडझड लक्षात घेऊन ही 10 चेनसॉ यंत्रे प्रत्येक पंचायतीला आणि नगरपालिकेला भेट दिलीत, असं कवळेकर म्हणाले.

हेही वाचाः प्रशासकीय, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी शिक्षण संचालनालयाने जारी केलं परिपत्रक

तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी तयारी सुरू

कोविडच्या तिसऱ्या लाटेशी लढण्याची तयारी आम्ही आताच सुरू केली आहे. ऑक्सिजन काँसंट्रेटर सभोवतालच्या 6 प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिलेत, तर प्रत्येक पंचायतीला एक एक ऑक्सिजन सिलिंडर प्रशिक्षित माणसासह ठेवण्यात येणार आहे. तसंच म्हटलं जातं की कोविडची तिसरी लाट मुलांसाठी घातक असणार आहे. त्यामुळे 15 खाटा मुलांसाठी आरक्षीत ठेवल्या आहेत. त्याच बरोबर आम्ही बालरोग तज्ज्ञांशी सेवा पुरविण्याबद्दल बोलणी चालू केली आहेत, असं कवळेकर म्हणाले.

हेही वाचाः CORONA UPDATE | रुग्णवाढ घटतेय; मात्र तरीही चिंता

यंत्रामुळे काम होणार सोपं

यावेळी अमोल काणेकर आणि प्रसाद फळदेसाई यांनी कोविड काळात उपमुख्यमंत्र्यांनी केलेल्या कामाबद्दल आपले विचार व्यक्त केले. सरपंच आणि जिल्हा पंचायत सदस्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी ही यंत्रे दिल्याने ग्रामीण भागात येत्या पावसाळ्यात भरपूर मदत होणार असल्याने आनंद व्यक्त केला. पावसाळ्यात केपे मतदारसंघात झाडे पडणं, वीज प्रवाह खंडीत होणं घडत असतं. सरकारी यंत्रणा गावात पोहोचेपर्यंत भरपूर उशीर होतो. या यंत्रांमुळे तेवढं काम सोपं करण्यासाठी मदत होईल, असं दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीचे उपाध्यक्ष खुशाली वेळीप म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!