भाजपायुमो वास्को मंडळातर्फे आयुर्वेदीक औषधांचे वितरण

Goan Varta Live | प्रतिनिधी
वास्कोः भाजपायुमोच्या वास्को मंडळाने वास्को अग्निशमन दलाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी औषधं (गुळवेल) तसंच एन-95 मास्क दिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर येऊन सात वर्षं पूर्ण झाल्याबद्दल देशभरात आयोजित ‘सेवा ही संघटन’ या अभियानाचा एक भाग म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा उपस्थित होते.
हेही वाचाः स्थानिकांचा विरोध असल्यास तरंगत्या जेटीचं स्थलांतरण
आयुर्वेदिक औषधांचं वितरण
आमदार आल्मेदा यांनी यापूर्वी वास्को पोलिस स्थानकातील अधिकारी आणि कर्मचारी वर्गाला रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारी आयुर्वेदिक औषधं दिली होती. शुक्रवारी त्यांनी वास्को अग्निशमन दलाच्या कार्यालयाला भेट दिली. याप्रसंगी दक्षिण गोवा भाजपायुमोचे उपाध्यक्ष गौरीश नाईक, नगरसेवक अमेय चोपडेकर, किरण नाईक आणि इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचाः रेस्टॉरंट्स, ब्यूटी पार्लरही बँकेकडून कर्ज काढू शकणार
अग्निशमन दलाकडून वृक्षारोपण
वास्को अग्निशमन दलाने ‘कोविड’ महामारीच्या पार्श्वभूमीवर तसंच ‘तौक्ते’ चक्रीवादळानंतर झालेल्या पडझडीनंतर केलेल्या कार्याची आमदार कार्लुस यांनी प्रशंसा केली. याप्रसंगी वास्को अग्निशमन दलाने स्थानिक परिसरात वृक्षारोपण केलं. आमदार आल्मेदा यांनी तेथील एकंदर परिस्थितीचा आढावा घेतला. वास्को अग्निशमन दलाचे फ्रान्सिस्को मेंडिस आणि इतर कर्मचारी यावेळी उपस्थित होते.