१० आमदारांच्या अपात्रता याकिचेवर आता ‘या’ न्यायपीठासमोर सुनावणी

उच्च न्यायालयाकडून विशेष न्यायपीठाची स्थापना; गिरीश चोडणकरांनी दाखल केली होती अपात्रता याचिका

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः आमदार अपात्रता प्रकरणी गिरीश चोडणकर यांनी दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणीसाठी उच्च न्यायालयाने विशेष न्यायपीठाची स्थापना केली आहे. काँग्रेसमधून भाजपात गेलेल्या १० आमदारांच्या अपात्रता याकिचेवर आता या न्यायपीठासमोर सुनावणी होणार आहे. काँग्रेसच्या १० आमदारांनी पक्षाच्या बनावट दस्तावेज वापरून भाजपमध्ये प्रवेश केल्याचा दावा करत काँग्रेसचे गोवा प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकरांनी पक्षांतर करून भाजपात गेलेल्या 10 आमदारांच्या विरोधात अपात्रता याचिका दाखल केली होती.

हेही वाचाः तानावडेंचं मानसिक संतुलन बिघडलं आहे

८ ऑगस्ट रोजी अपात्र याचिका दाखल

आमदार चंद्रकांत कवळेकर, मंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज, मंत्री जेनिफर मॉन्सेरात, आमदार बाबुश मॉन्सेरात, नीळकंठ हळर्णकर, फ्रान्सिस सिल्वेरा, टोनी फर्नांडिस, उपसभापती इजिदोर फर्नांडिस, क्लाफासिओ डायस, विल्फ्रेड डिसा या दहा जणांनी १० जुलै २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला आहे. प्रदेशाध्यक्ष गिरीष चोडणकर यांनी ८ ऑगस्ट रोजी सभापती समोर १० बंडोखोर आमदाराविरोधात अपात्र याचिका दाखल केली होती. त्यानंतर २० एप्रिल २०२१ रोजी सभापती राजेश पाटणेकर यांनी अपात्र याचिका फेटाळून लावली.

हेही वाचाः CORONA UPDATE | देशात नव्या कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला

१० बंडोखोर आमदारांनी तयार केले काँग्रेस पक्षाचे बनावट दस्तावेज

या निकालाला चोडणकर यांनी खंडपीठात याचिका दाखल करून सभापतीच्या निवाडाला आव्हान दिलं होतं. दरम्यान या प्रकरणी १० बंडोखोर आमदारांनी काँग्रेस पक्षाचे बनावट दस्तावेज तयार करून भाजप प्रवेश केल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर चोडणकर यांनी या प्रकरणी पणजी पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. ती तक्रारीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला नसल्यामुळे चोडणकर यांनी पणजी येथील प्रथमवर्ग न्यायालयात अर्ज दाखल करून पोलिसांना गुन्हा दाखल करून कारवाई करण्याचा निर्देश देण्याची मागणी केली आहे. या प्रकरणी उच्च न्यायालायने विशेष न्यायपीठाची स्थापना करण्यासाठी निर्देश जारी केलेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!