४० लाखांच्या तीन गाड्यांवरून मडगाव पालिकेत वाद

नगरसेवक घनश्याम प्रभुशिरोडकर यांनी अभियंता रोहीत गावकर यांना धारेवर धरलं

अजय लाड | प्रतिनिधी

मडगाव : येथील पालिकेने तत्कालिन मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांच्या कार्यकाळात २०१९ मध्ये ४० लाख रुपये खर्चून बीएस-४ प्रकारातील तीन ट्रक खरेदी केले होते. मात्र, गाड्यांची नोंदणी करून पालिकेने त्या ताब्यात घेतल्या नाहीत. आता बीएस-६ प्रकारातील गाड्यांची नोंदणी होत असल्याने त्या गाड्या कशा आणणार, असा सवाल करत नगरसेवक घनश्याम प्रभुशिरोडकर यांनी अभियंता रोहीत गावकर यांना धारेवर धरलं.

हेही वाचाः ४० लाखांच्या तीन गाड्यांवरून मडगाव पालिकेत वादंग

एप्रिल २०२० पर्यंत ही वाहने नोंदणी करण्याची मुभा होती

पालिका मंडळाच्या बैठकीत नवी वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव आला असता, प्रभुशिरोडकर यांनी हा मुद्दा उपस्थित केला. मेकॅनिकल अभियंता रोहीत गावकर यांच्याकडे याविषयी स्पष्टीकरण मागितलं. गाड्या खरेदीसाठी २०१९ मध्ये ई-निविदा काढण्यात आली होती. त्यात कुणीही सहभाग घेतला नाही. त्यामुळे तीन ठिकाणांहून कोटेशन मागवून निविदा प्रक्रिया करण्यात आली. नंतर खरेदी केलेली वाहनं ताब्यात घेतली नाहीत. मात्र, त्यांची बॉडी बनवण्यासाठी निविदा काढण्यात आली. तत्कालिन मुख्याधिकारी नाईक यांच्या सूचनेनुसार आपण वाहनांचा ताबा घेतला नाही, असंही गावकर यांनी सांगितलं. दरम्यान, एप्रिल २०२० पर्यंत ही वाहने नोंदणी करण्याची मुभा होती, तरीही ती नोंदणी करण्यात आली नसल्याचं प्रभुशिरोडकर यांनी निदर्शनास आणून दिलं.

हेही वाचाः CURFEW | कर्फ्यूचा कालावधी आणखी वाढणार

कॉम्पॅक्टरसह आणखी पाच ट्रक घेण्यास पालिका मंडळाची परवानगी

गाड्यांच्या संदर्भात विशेष बैठक घेणं आणि दोषींवर कारवाई करण्याबाबत पालिका मंडळ निर्णय घेईल, असं नगराध्यक्ष लिंडन परेरा यांनी सांगितलं. मात्र, कॉम्पॅक्टरसह आणखी पाच ट्रक घेण्यास पालिका मंडळाने या बैठकीत परवानगी दिली आहे.

हा व्हिडिओ पहाः Video | ACCIDENT | वाळपई हेल्थ सेंटरसमोर इनोव्हाची गुरांना धडक

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!