भुईपाल विद्यालयातील वाद अखेर पोलिसापर्यंत

Goan Varta Live | प्रतिनिधी
वाळपईः पर्ये मतदारसंघात येणाऱ्या भुईपाल सत्तरी येथील सरकारी माध्यमिक विद्यालयातील एका शिक्षकाने विद्यालयाच्या मुख्याध्यापिके विरोधात होंडा पोलिस चौकीत तक्रार केली असल्याची माहिती मिळाली आहे. सदर प्रकरणाची दखल घेऊन त्यांना आज चौकशीसाठी वाळपई पोलिस स्थानकात बोलावण्यात आलं होतं.
हेही वाचाः अरे, हे तर आपल्यातलेच..!
या विद्यालयाचे शिक्षक महेश नाईक यांनी तक्रार दाखल करताना म्हटलं, की मुख्याध्यापिकेचं मानसिक संतुलन बिघडल्यानं ती माझ्याशी असभ्य वर्तणूक करते आहे.
हेही वाचाः अंतर्बाह्य बदलून टाकणारी ‘दिठी’
शिक्षक-मुख्याध्यापिकेमधील संबंध बिघडले
गेल्या तीन चार वर्षांपासून या विद्यालयाचा निकाल शिक्षक आणि मुख्याध्यापिका यांच्या सहकार्याने समाधानकारक लागत आहे. यामुळे इथे विद्यार्थ्यांची संख्या वाढत होती. परंतु काही दिवसांपासून येथील शिक्षक आणि मुख्याध्यापिका यांच्यातील संबंध बिघडल्यानं त्याचाच परिणाम म्हणून आज एका शिक्षकाने अखेर थेट पोलिसात तक्रार केली.
हेही वाचाः VIRAL VIDEO | जो शक्तिशाली आहे तो जगू शकतो, हाच जंगलाचा नियम
उत्तर गोवा शिक्षण विभागाचे उपसंचालकांकडे केली होती तक्रार
दरम्यान या विद्यालयातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सदर विद्यालयाच्या मुख्याध्यापिका रोझी मिनेजिस यांच्या विरोधात 19 मार्च 2021 रोजी मुख्याध्यापिकेकडून होणारी सतावणूक तसंच सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांशी गैरवर्तणूक करीत असल्याचं नमूद करून लेखी तक्रार उत्तर गोवा शिक्षण विभागाचे उपसंचालकांकडे केली होती. परंतु सदर तक्रारीची कोणतीच दखल त्यावेळी शिक्षण खात्याने घेतली नाही.