पोलिसांकडून 1.23 कोटींच्या अमली पदार्थांची विल्हेवाट

गुरुवारी 12 ऑगस्ट रोजी गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या भट्टीत विल्हेवाट लावली

प्रसाद शेट काणकोणकर | प्रतिनिधी

पणजी: गोवा पोलिसाच्या अमली पदार्थ विल्हेवाट समितीने १ कोटी २३ लाख ३९ हजार रुपये किमतीचे ३०.१०६ किलो ग्रॅम अमली पदार्थ गुरुवारी १२  रोजी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालय इस्पितळाच्या भट्टीत विल्हेवाट लावली आहे.

हेही वाचाः हणजुण येथील “सनबर्न बीच क्लॅब” 4 आठवड्यांत जमीनदोस्त करा

१ कोटी २३ लाख ३९ हजार  रुपये किमतीचे ३०.१०६ किलो ग्रॅम अमली पदार्थाची विल्हेवाट लावली

या प्रकरणी अमली पदार्थ विल्हेवाट समितीचे अध्यक्ष पोलिस उपमहानिरीक्षक प्ररमादित्य यांच्या अध्यक्षतेखाली, गोवा पोलिसांच्या निकालात काढलेल्या २१ गुन्ह्यात जप्त करण्यात आलेल्या १ कोटी २३ लाख ३९ हजार  रुपये किमतीचे ३०.१०६ किलो ग्रॅम अमली पदार्थाची विल्हेवाट लावली आहे. या समितीत अध्यक्ष पोलिस उपमहानिरीक्षक प्ररमादित्य याच्यासह, पोलिस मुख्यालयाचे अधीक्षक अभिषेक धानिया, अमली पदार्थ विरोधी पथकाचे अधीक्षक महेश गावकर आणि अन्न व औषध प्राधिकरणाचे उप संचालक श्वेता देसाई याच्या सदस्य म्हणून समावेश आहे.

या समितीने आदेश जारी करून अमली पदार्थ विल्हेवाट करण्यात आला. यात १ कोटी १५ लाख १२ हजार रुपये किमतीचा २३.०२४ किलो ग्रॅम चरस, ७ लाख ७ हजार रुपये किमतीचा ७.०७ किलो ग्रॅम गांजा आणि १ लाख २० हजार रुपये किमतीचा १२ ग्रॅम कोकन मिळून १ कोटी २३ लाख ३९ हजार  रुपये किमतीचे ३०.१०६ किलो ग्रॅम अमली पदार्थाची विल्हेवाट लावण्यात आली आहे. 

हा व्हिडिओ पहाः Politics | ALINA SALDHANA | २०२२मध्ये कुठ्ठाळीत मीच भाजप उमेदवार- एलिना

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!