घृणास्पद । अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

उमेश झर्मेकर | प्रतिनिधी
म्हापसाः येथील पोलिस स्थानकाच्या हद्दीत एका 14 वर्षीय अल्पवयिन मुलीवर लैगिक अत्याचाराची घटना घडलीये. या प्रकरणी पोलिसांनी उमेश उर्फ उम्या मिथाप्पा लमानी (रेवोडा, मुळ गदग कर्नाटक) यास अटक करण्यात आलीये. पीडित युवती चार महिन्याची गरोदर आहे.
हेही वाचाः आता जेटीचं पणजीत स्थलांतर
पीडिता 4 महिन्यांची गरोदर
याबाबत म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना गेल्या जानेवारीमध्ये घडली होती. पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने तिला तिच्या पालकांनी येथील एका हॉस्पिटलात आणलं होतं. उपचारादरम्यान अल्पवयीन मुलगी चार महिन्याची गरोदर असल्याचं डॉक्टरांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर सदर हॉस्पिटलातून म्हापसा पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिस चौकशीवेळी सदर पीडितेने जानेवारीमध्ये आपल्यावर संशयित आरोपीने बळजबरी केल्याचं सांगितलं.
हेही वाचाः ACCIDENT | कुठ्ठाळी अपघातात एक महिला ठार
संशयितास अटक; गुन्हा दाखल
पोलिसांनी संशयितास अटक केलीये आणि पीडितेच्या आईच्या तक्रारीच्या आधारे संशयिताविरूध्द भा.दं.सं.च्या कलम 372 (2)(1), 506 (2), तसेच बाल कायदा कलम 8 व पोक्सो कायदा कलम 4, 8 व 12 खाली गुन्हा दाखल केला आणि त्यास अटक केली. पुढील तपास पोलिस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रिचा भोसले करीत आहेत.