म्हादईप्रश्न पंतप्रधानांकडे घेऊन चला, विरोधीपक्षाची मागणी

म्हादईवरुन सभागृहात सविस्तर वादविवाद

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो : वादग्रस्त ठरलेल्या म्हादईवर हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी चर्चा झाली. यावेळी म्हादईचा पाणीप्रश्न न्यायप्रविष्ट असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. सभागृहातील चर्चेचा न्यायालयीन सुनावणीवर परिणाम होऊ नये, असंही यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलंय.

म्हादई प्रश्नावर राजकीयदृष्ट्या अन्याय होणार नाही, गरज पडली तर पंतप्रधानांनी भेटू आणि आमची कायदेशीरबाजू भक्कम असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत दिली. त्याचप्रमाणे सर्वपक्षियांनी म्हादईच्या लढ्यात एकत्र येण्याचं आवाहनही केलं. राजकीय विषय बाजूला ठेवून म्हादईबाबत सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. म्हादई मला माझ्या आईप्रमाणे असल्याचा पुनरुच्चार मुख्यमंत्र्यांनी यावेळी पुन्हा एकदा केला. तसंच कर्नाटकनं म्हादईचं पाणी वळवल्याचंही त्यांनी सभागृहात बोलताना मान्य केलं.

हेही वाचा – ‘म्हादईबाबतचे आरोप खरे निघाले तर मी राजीनामा देईन!’

म्हादईचा सौदा?

दरम्यान, सर्वच विरोधी पक्षांनी म्हादईप्रश्नावरुन सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. सुरुवात केली ती गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनी. म्हादईप्रश्नी सरकारकडून लोकांची फसवणीक सुरु असल्याचा आरोप विजय सरदेसाईंनी यावेळी केला. यावेळी उपसभापती इजिदोर फर्नाडिस आणि विजय सरदेसाईंमध्ये शाब्दिक चकमक उडाली. कर्नाटकने म्हादईचा प्रवाह वळवल्याचा दावा यावेळी विजय सरदेसाईंनी अधिवेशनात केला. तर रोहन खंवटेंनीही सरकारच्या वकिलांनी म्हादईचा सौदा केल्याचं म्हटलंय.

हेही वाचा – एक दोन नव्हे, म्हादईवर ‘इतक्या’ धरणांचा प्रस्ताव

कर्नाटकनं पाणी वळवण्यास सरकारचं जबाबदार असल्याचा आरोप आमदार एलेक्स रेजिनाल्ड यांनी केलाय. तर लुईजिन फालेरो यांनी म्हादईच्या लढ्याबाबत आम्ही सरकारच्या सोबत असल्याचं म्हटलंय.

राजकारण नको!

या सगळ्यात मुख्यमंत्र्यांनी म्हादईचं राजकारण मला करायचं नसल्याचं विरोधकांना ठणकावून सांगितलं. दरम्यान, या संपूर्ण म्हादईप्रश्नावरील चर्चेवेळी टोनी फर्नांडिस-विजय सरदेसाईंमध्ये चांगलीच जुंपली होती. महत्त्वाचं म्हणजे कर्नाटकनं आधीच पाणी वळवला असून आपण हा लढा हरण्याच्या मार्गावर, असं म्हणज लुईझिन फालेरोंनी म्हादईचा प्रश्न हाताबाहेर गेल्याचं सरकारच्या निदर्शनास आणून दिलंय.

गोवा सरकारने म्हादई विकली!

चला पंतप्रधानांकडे

यावेळी विरोधी पक्षनेते दिगंबर कामतांनी हा प्रश्न पंतप्रधानांकडे नेऊन यावर सर्वपक्षीयांना राजकीय तोडगा काढावा आणि त्यासाठी मुख्यमंत्र्यांनी विशेष प्रयत्न करावेत, अशी मागणी केली. एकूण हिवाळी अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी म्हादईचा विषय दुसऱ्या सत्रात चांगलाच गाजला. यावेळी सभागृहात म्हादईवरुन गरमागरम चर्चा झाल्याचं पाहायला मिळालं.

अधिवेशन लाईव्ह पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

पाहा Video | Panchnama | म्हादई तिचं राजकारण आणि तुम्ही आम्ही

हेही वाचा – लॉकडाऊनमध्ये कर्नाटककडून म्हादईचे पाणी मलप्रभेत!

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!