गोगलगायींच्या दोन नव्या प्रजातींचा शोध

एक राधानगरी वन्यजीव अभयारण्यात तर दुसरी आढळली आंबोलीत

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : जैवविविधतेसाठी जगप्रसिध्द असलेल्या पश्चिम घाट परिसरात गोगलगायींच्या दोन नव्या प्रजाती शोधण्यात यश आलंय. यापैकी एक राधानगरी वन्यजीव अभयारण्यात तर दुसरी आंबोली इथं आढळून आलीय.

राधानगरी इथं आढळलेली ही 117 वर्षांनंतर ‘पेरोटेटिया’ या पोटजातीतील एका प्रजातीपैकी असल्याचा शोध लागला आहे. तर आंबोली इथं आढळलेल्या दुसया प्रजातीचं नाव ‘वरदिया आंबोलिएन्सिस’ असं ठेवण्यात आलंय.

कराड इथल्या एसजीएम काॅलेजचे प्रभारी सहायक प्राध्यापक डाॅ. अमृत भोसले, ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनचे प्रमुख, संशोधक तेजस ठाकरे आणि बेन रोव्हसन यांनी या प्रजातींचा शोध लावलाय. डाॅ. अमृत भोसले हे गोगलगायींच्या नव्या प्रजातींवर सातत्यानं संशोधन करत आहेत. दरम्यान, पश्चिम घाटातल्या अनेक प्रजातींचा अभ्यास होण्याची गरज आहे, असं तेजस ठाकरे यांनी म्हटलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!