शिक्षण विभागाला आपल्या कर्मचाऱ्यांची चिंता आहे की नाही?

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत जाणं बंधनकारक

धनश्री मणेरीकर | प्रतिनिधी

पणजीः राज्यात कोरोनाच्या उद्रेकाने हळुहळू सर्व सीमा ओलांडण्यास सुरुवात केलीये. मृतांचा आकाड वाचल्यास कोणीही घाबरून जाईल. मात्र शिक्षण विभागाला आपल्या खात्यातील कर्मचाऱ्यांच्या आरोग्याची चिंता नाही असंच काहीसं चित्र दिसतंय.

हेही वाचाः ‘त्या’ कामचुकार कर्मचाऱ्यांविरुद्ध कारवाई कधी?

आम्हालाच शाळेत येण्याची सक्ती का?

सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्यात. शाळा, कॉलेज, क्रीडा महोत्सव सगळं बंद करून, फक्त ऑनलाईन शिक्षण सुरू ठेवण्यास सांगितलं असतानाही शिक्षण संचालनालयाने सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमितपणे शाळेत येणं बंधनकारक करणारं परिपत्रक जारी केलंय. त्यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी दिसून येतेय. तसंच आम्हालाच शाळेत येण्याची सक्ती का, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केलाय.

हा व्हिडिओ पहाः Exams | Video | परीक्षा रद्द करा, अन्यथा ऑनलाईन परीक्षा घ्या!

शिक्षण संचालनालयाने प्रशासनाच्या कार्यालयीन निवेदनाला धुडकावून लावलं

कोविड-१९च्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर सामान्य प्रशासनाकडून जारी करण्यात आलेल्या २१ एप्रिल रोजीच्या कार्यालयीन निवेदनात प्राथमिक, उच्च, मध्यम आणि उच्च माध्यमिक शाळांसह अनुदानित संस्थांना त्याच्या कक्षेत समाविष्ट केलं होतं. पोलिस, होमगार्ड नागरी संरक्षण, अग्निशमन व आपत्कालीन सेवा, आपत्ती व्यवस्थापन, कारागृह, कोषागार, जिल्हा प्रशासन, वन विभाग आणि नगरपालिका सेवा कोणत्याही निर्बंधांशिवाय कार्य करतील, असं या परिपत्रकात नमूद करण्यात आलं होतं. परंतु, राज्यातील इतर सर्व सरकारी विभाग प्रतिबंधित कर्मचाऱ्यांसमवेत काम करतील, असं स्पष्ट सांगितलं होतं. ‘अ,’ ‘ब’ गटातील अधिकारी उपस्थित राहतील, तर गट ‘क’ आणि त्यापेक्षा कमी पातळीवरील कर्मचाऱ्यांची ५० टक्के उपस्थितीतच सक्तीची करण्यात आली होती. मात्र शिक्षण संचालनालयाने प्रशासनाच्या कार्यालयीन निवेदनाला धुडकावून लावत अनुदानित संस्थांमधील सर्व अध्यापन आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दररोज कामावर उपस्थित राहण्याची सक्ती केली आहे.

हेही वाचाः NEET PG 2021 Postponed | वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर NEET PG परीक्षा अखेर रद्द

शिक्षण संचालनालयाकडून शिक्षकांसाठी खास परिपत्रक

कार्यालयीन निवेदनाच्या एका दिवसानंतर शिक्षण संचालनालयाने एक परिपत्रक जारी केलं असून त्यात शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना शाळेत जाणं बंधनकारक करण्यात आलं आहे. हे परिपत्रक जारी केल्यानंतर शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण झालाय. कार्यालयीन निवेदनाचं उल्लंघन करत उच्च माध्यमिक शाळांमधील अनेक शिक्षक ‘क’ गटातील आहेत, ज्यांना नियमितपणे कामावर उपस्थित राहण्यास शिक्षण संचालनालयाकडून भाग पाडलं जातंय.

हेही वाचाःआंदोलक विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात

शिक्षकांकडून तीव्र नाराजी

यामुळे शिक्षकांमध्ये तीव्र नाराजी पसरलीये. शाळा विद्यार्थ्यांसाठी बंद, मग शिक्षण खातं शिक्षकांना बोलावून काय साध्य करू पाहतंय, असा प्रश्न शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचारी विचारतायत. तसंच वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या जिवाशी खेळ का केला जातोय, असा सवालही शिक्षक तसंच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून उपस्थित करण्यात आलाय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!