माहिती खात्यातर्फे गोव्यातील ‘मान्सून आणि त्याची वैशिष्ट्ये’वर वेबिनार

वेबिनार लोकांसाठी खुला; डॉ. जे आर कुलकर्णी वेबिनारचे वक्ते; हंगामाची वास्तविकता, अचूक माहिती मिळणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः राज्यातील माहिती आणि प्रसिद्धी खात्यातर्फे गोव्यात पावसाळ्यातील हवामान बदलाची वैशिष्ट्ये आणि हवामान बदलाचा परिणाम  या विषयावर वेबिनारचं आयोजन करण्यात आलंय. शुक्रवार ११ जून संध्याकाळी ४.०० वाजता हा वेबिनार होणार आहे. गोवा मुक्तीच्या हिरक महोत्सवी कार्यक्रमांतर्गत माहिती आणि प्रसिध्दी खात्याने या वेबिनारचं आयोजन केलंय.

हेही वाचाः इंडोनेशियात विष्णूची सर्वात मोठी मूर्ती

लोकांसाठी खुला

पावसाळ्यात विशेषत: पूरग्रस्त भागात, दरड कोसळणाऱ्या भागात प्रतिबंधात्मक उपाय हाती घेण्यासाठी तसंच  पुरामुळे आणि पावसामुळे जीवन तसंच मालमत्तेचे होणारं इतर नुकसान यासंबंधी लोकांना माहिती देणं हा या वेबिनारचा उद्देश आहे. हा वेबिनार लोकांसाठी खुला राहील.

हेही वाचाः गर्भवती महिलांनी तूर्तास कोरोनाप्रतिबंधक लस घेऊ नये

डॉ. जे आर कुलकर्णी वेबिनारचे वक्ते

निवृत्त आयआयटीएम ज्येष्ठ वैज्ञानिक आणि आयएमएसचे  माजी अध्यक्ष (पुणे चापटर) डॉ. जे आर कुलकर्णी हे मराठी आणि इंग्रजी भाषेतून गुगल मीटव्दारे वरील विषयावर बोलतील. हवामानाच्या विविध प्रकारांवरही ते या वेबिनारमध्ये बोलणार आहेत.

हेही वाचाः देशात बुधवारी २५ लाख २८ हजार लाभार्थ्यांचं लसीकरण पूर्ण

हंगामाची वास्तविकता, अचूक माहिती मिळणार

गोवा राज्यात पावसाळा सुरू झाल्यावर लोकांच्या मनात अनेक शंका तसंच प्रश्न निर्माण होतात. या हंगामाशी संबंधित वास्तविकता आणि अचूक माहिती प्रदान करण्यासाठी हवामान विषयावर वेबिनारव्दारे सत्राचे आयोजन करण्यात आलं आहे.

हेही वाचाः प्रधानमंत्री नागरी आवास योजनेंतर्गत ७०८ प्रस्तावांना केंद्रसरकारची मंजुरी

http://meet.google.com/fcx- bbbn-yup अशी वेबिनारची व्हीडियो कॉल लिंक आहे, असं माहिती खात्यातर्फे कळविण्यात आलं आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!