भाजप निवडणुकांवर डोळा ठेवून फेक आश्वासनांचा जुमला खेळतंय- दिगंबर कामत

कोविड लसीचे राजकारण केल्यावरुन कामतांचा अर्थमंत्र्यांवर निशाणा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : गोव्याचे विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत यांनी केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सिथारामन यांच्या देशातील पहिल्या कोविड लसीचे बिहारात सर्वात प्रथम मोफत वितरण करण्यात येणार आहे आणि तोच भाजपचा बिहार निवडणुकीचा प्रथम क्रमांकाचा जाहिरनामा आहे, या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे.

लसीवरुन राजकारण

भाजपची आर्थिक दिवाळखोरी सर्वांना माहीत होती. पण आता वैचारीक दिवाळखोरी उघड झाली आहे. कोविड आजाराची लस निघाल्यास ती मिळवण्याचा सर्व राज्यांना समान अधिकार आहे. आजाराचा बाजार करणाऱ्या भाजपने कोविड लसीचे राजकारण करु नये, असं ट्विट करत दिगंबर कामत यांनी केंद्रिय अर्थ मंत्र्यांची कानउघाडणी केली आहे.

कोविड महामारीने संपूर्ण जग आज त्रस्त आहे. अशा संकटाच्या वेळी भाजप सरकारच्या केंद्रीय मंत्री केवळ राजकीय स्वार्थासाठी कोविड लसीचं राजकारण करतायत. हे अत्यंत दुर्देवी आहे, असं दिगंबर कामत यांनी म्हटलंय. कोविडची लस अजून यायची आहे, परंतु ती आल्यास केवळ बिहार राज्याला ती देण्याचा आणि इतरांना डावलण्याचा अधिकार भाजप सरकारला कुणी दिला?, असा प्रश्न दिगंबर कामत यांनी उपस्थित केलाय.

कामत यांचा केंद्रीय अर्थमंत्र्यांना सवाल

जर बिहारलाच मोफत कोविड लस भाजप सरकार देणार असेल, तर इतर राज्यांनी काय करावे अशी केंद्रिय अर्थ मंत्र्यांची अपेक्षा आहे असा प्रस्न विचारुन, इतर राज्यांतील लोकांनी आपल्या निवडणुका येई पर्यंत वाट बघत रहावी अशी भाजपची अपेक्षा आहे का?

केंद्रीय मंत्र्यानी नवीन आश्वासनं देण्याऐवजी याआधी दिलेली आश्वासने पूर्ण करावीत. आतापर्यंत भाजप निवडणुकांवर डोळा ठेवून केवळ फेक आश्वासनांच्या आधारावर जुमला राजकारण खेळतंय, असा टोला दिगंबर कामत यांनी हाणला.

केंद्राची मदत न मिळणं दुर्दैवी

गोवा राज्य केंद्र सरकारकडून आपल्या हक्काच्या जीएसटीच्या वाटा मिळण्याच्या प्रतीक्षेत आहे. ज्येष्ठ नागरीक, विधवा, विशेष व्यक्ती तसेच दर्यावर्दी आणि त्यांचे कुटुंबीय मासिक पेन्शनासाठी सरकारकडे याचना करतायत. परंतु, केंद्र सरकारकडून कसलीच मदत गोव्याला मिळत नाही. हे दुर्देवी आहे, असं दिगंबर कामत यांनी म्हटलंय.

हेही वाचा –

देशात प्लाझ्मा थिरपी लवकरच बंद होणार

मोठा दिलासा! ‘या’ महिन्यात कोरोना नियंत्रणात येणार

‘बबडो नालायक असा’, वेंगुर्ल्याच्या मालवणी आजींची बबड्यावर आगपाखड

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!