धिरयो: चौघांवर गुन्हा नोंद

कोलवा पोलिसांची कारवाई

Goan Varta Live | प्रतिनिधी

मडगाव: दोन दिवसांपूर्वी बाणावलीतील वार्का, फात्राडे परिसरात धिरयो होणार असल्याच्या पोस्ट व्हायरल होत होत्या. यानंतरही पोलीस प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने धिरयो झाल्याची माहिती मिळत आहे. याप्रकरणी कोलवा पोलिसांनी चार जणांवर गुन्हा नोंद केला आहे.       

हेही वाचाः कौतुकास्पद! सर्पमित्र प्रचिताच्या धाडसाची गोष्ट

सोशल मीडियावर पोस्ट वायरल

पीपल्स फॉर एनिमल्स संस्थेच्या गोवा निमंत्रक नॉर्मा आल्वारिस यांनी कोलवा पोलीस ठाण्यात निवेदन सादर करत शनिवारी बाणावली परिसरातील धिरयो आयोजित केलेल्या असल्याबाबत माहिती देत पोलिसांना सतर्क केलं होतं. समाज माध्यमांवरही बाणावली परिसरातील राजकीय नेत्याच्या पुतण्याच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येत असल्याच्या पोस्ट व्हायरल झालेल्या होत्या. फात्राडे येथे धिरयोच्या ठिकाणी पोलीस कारवाईसाठी गेले असता राजकीय नेत्यांच्या पुतण्याने व लोकांनीही पाेलिसांना माघारी पाठविले. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास या धिरयो पार पडल्या.       

चार जणांवर गुन्हा नोंद

धिरयो आयोजनाबाबत कोलवा पोलिसांनी चौकशी अंती चार जणांवर गुन्हा नोंद केला आहे. कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फात्राडे येथील धिरयो आयोजनात सहभागी ‘मोरा’ बैलाचा मालक रोमेओ वाझ (४०, रा. फात्राडे)   व ‘अंत्या’ या बैलाचा मालक महम्मद घोष शेख ( ३२, रा. वार्का ) यांच्यावर गुन्हा नोंद केलेला आहे. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक अजित वेळीप तपास करत आहेत. तर दुसऱ्या धिरयो आयोजना प्रकरणी ‘नशा’ या बैलाचा मालक जॉर्ज डिसिल्वा (३२, रा. कोलवा) व ‘लकी’ या बैलाचा मालक अब्दुल रहीम शेख (२७, रा. वार्का) या दोन्ही संशयितांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या प्रकरणी हेड कॉन्स्टेबल बाबय गावकर पुढील तपास करत आहेत.

हा व्हिडिओ पहाः VIDEO | MISSION 22 PLUS | भाजपचं २०२२साठी संघटनात्मक काम सुरू

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!