हाळी चांदेल येथे धालोत्सवाची सांगता

पारंपरिक गीत गायन

Goan Varta Live | प्रतिनिधी

पेडणेतील हाळी चांदेल येथे शनिवारी ३० रोजी पारंपरिक धालोत्सवाची सांगता झाली. या गावात वार्षिकरित्या धालोत्सव साजरा होत असतो. कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन यंदाही धालोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.

वस पंचायतन आणि देव राट्रोळी याचा आशीर्वाद घेऊन पाच दिवसांचा धालोत्सव साजरा केला जातो. पहिल्या दिवशी धाल्याचा मांड बांधला जातो त्यानंतर धालो खेळला जातो. पारंपरिक पद्धतीने धोलो गीत गाणे, देवतांना धाल्याच्या मांडावर बोलावणे, लग्न लावणे इत्यादी खेळ खेळले जातात. त्यानंतरचे पुढील तीन दिवस हे खेळ खेळतात. धालोत्सवात शेवटचा दिवस मात्र महत्त्वाचा असतो. संध्याकाळी पाच वाजल्यापासून गावातील बायकांची लगबग सुरू होते. त्यानंतर रात्री आठच्या दरम्यान प्रसादाची पावणी होते. ही पावणी घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. पावणी झाल्यानंतर महाप्रसाद होतो आणि पुन्हा एकदा बायकांचा धालो खेळ खेळतात.हा खेळ चालू असताना मध्यरात्र उलटल्यावर देवांचा कौल होतो. त्यानंतर धालो खेळ समारोपकडे जातो. धालोत्सव संपेपर्यंत दुसरा दिवस उजाडतो. सूर्योदयानंतर धाल्याचा मांड शेणाने सारवून सांगता होते.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!