देवगड – तांबळडेग समुद्रकिनारी ३० ते ३५ फूट लांब व्हेल मासा

मासा पाहण्यासाठी मोठी गर्दी ; प्रशासन मात्र अनभिज्ञ

Goan Varta Live | प्रतिनिधी

देवगड : देवगड तालुक्यातील तांबळडेग समुद्रकिनारी ३० ते ३५ फूट लांब व्हेल मासा आढळून आला. हा व्हेल मासा मृतावस्थेत असल्याने किनारपट्टी भागात दुर्गंधी निर्माण झाली. हा महाकाय व्हेल मासा पहाण्यासाठी स्थानिकांनी समुद्र किनारी गर्दी केली.

गुरुवारी दुपारी तांबळडेग दक्षिणवाडा येथील समुद्र किनारी महाकाय व्हेल मासा किनाऱ्यावर लागला होता. संध्याकाळ उशिरापर्यंत या ठिकाणी प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची दखल घेण्यात आली नव्हती. व्हेल माश्याच्या दुर्गंधीमुळे परिसरात आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या गावात चतुर्थीनिमित्ताने चाकरमानी मोठ्या संख्येने आल्याने समुद्र किनारी बघ्यांची गर्दी झाली आहे.

याबाबत संबंधित विभागाने दखल घेऊन कुजलेल्या व्हेल माश्याची विल्हेवाट लावण्यात यावी, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!