देवेंद्र फडणवीस, अरवींद केजरीवाल यांचं सोमवारी गोव्यात आगमन

राज्यात आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला वेग

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

पणजीः राज्यात सर्वच पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. सर्व प्रमुख पक्षांचे राष्ट्रीय नेते तसंच निवडणुकांची जबाबदारी दिलेले नेते गोव्यात तळ ठोकून आहेत. काँग्रेसचे जेष्ठ नेते आणि गोव्याचे निवडणुक प्रमुख पी. चिदंबरम गोव्यात आहेत. ते सर्व मतदारसंघातील बुथ समिती आणि कार्यकर्त्यांना भेटत आहेत. रविवारी त्यांनी केपेतील कार्यकर्त्यांना संबोधीत केलं.

फडणवीस, केजरीवाल सोमवारी होतायत दाखल

गोव्याच्या निवडणुक प्रमुखपदी नियुक्ती झाल्यानंतर प्रथमच महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोमवारी म्हणजे उद्या दुपारी गोव्यात दाखल होणार आहेत. त्याचबरोबर आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालही सोमवारी दुपारी गोव्यात पोचणार आहेत.

हरवळेच्या प्रसिद्ध महादेव मंदीराला केजरीवाल देणार भेट

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीप्रमाणे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सोमवारी गोव्यात दाखल झाल्यानंतर ते हरवळेतील प्रसिद्ध महादेव मंदीराला भेट देणार आहेत. उद्या सोमवारही असल्याने त्याचे औचित्य साधून ही भेट ठरली असल्याचं समजतंय. मंगळवारी केजरीवाल म्हापशातील कार्यकर्त्यांना संबोधीत करणार आहेत.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!