वाळवंटीवरील बंधारे ठरतात पूराला कारणीभूत

ग्रामस्थांची प्रतिक्रिया; घोटेलीतील बंधारा हटवण्याची गरज असल्याचं ग्रामस्थांंचं मत

Goan Varta Live | प्रतिनिधी

सत्तरीः घोटेली नं. २ ते साखळीपर्यंत वाळवंटी नदीवर अनेक बंधारे बांधलेले असून या बंधाऱ्यांमुळेच या नदीचं पाणी गावात शिरतं, अशा प्रतिक्रिया उमटत आहेत. गेल्या सहा-सात वर्षांपूर्वी गोवा सरकारने गोव्यात गोड्या पाण्याच्या नद्यांत ‘वसंत बंधारे’ अंतर्गत नदी पात्रात बंधारे उभारलेले होते. येथील वाळवंटी नदीच्या पात्रात ८ बंधारे उभारले होते. काल जो वाळवंटीला पूर आला त्याचं एक कारण हे बंधारे असल्याचं दिसून आलं आहे.

हेही वाचाः दिगंबर कामतांनी वाहिली प्रा. गोपाळराव मयेकरांना आदरांजली

वाळवंटीला आलेल्या पुराच्या महत्त्वाची ठिकाणं ही बंधाऱ्याची

जेव्हा मोठा पाऊस पडत असतो तेव्हा नदी किनाऱ्याची झाडं नदीत पडून पाण्याच्या जोरावर वाहून येत असतात. आणि ती झाडं मग अशा बंधाऱ्यांना अडकतात. जेव्हा बंधाऱ्यांना झाडं – फांद्या अडकतात तेव्हा बंधाऱ्यात ठिकठिकाणी पाणी फुगतं आणि पाणी नदी बाहेर फुटून नदीला पूर येतो. यावेळी वाळवंटीला आलेल्या पुराच्या महत्त्वाची ठिकाणं ही बंधाऱ्याची असल्याचं आढळून आलं आहे. यात घोटेली, घोटेली १, मोर्ले, बागवाडा,पर्ये या ठिकाणी बंधारे आहेत.

हेही वाचाः ‘पत्रकारितेतील वाटचाल’ नव्या पिढीसाठी दिशादर्शक : ढवळीकर

घोटेलीतील बंधारा हटवण्याची गरज

दरम्यान घोटेली २ येथे आलेला पूर येथे असलेल्या बंधाऱ्यामुळे असल्याचं मत ग्रामस्थांनी व्यक्त केलं आहे. घोटेलीतील बंधारा हा इथल्या नदीवरील पुलाच्या खालच्या बाजूला आहे. यावेळी विर्डीतून येणाऱ्या वाळवंटी नदीच्या पाण्याबरोबर झाडं आणि फांद्या वाहून आल्या आणि बंधाऱ्यात अडकल्या. तसंच काही मोठी झाडं या पुलाला अडकली. त्यामुळे इथे पाणी साचलं आणि त्याच्या वाहण्याची गती मंदावली. परिणामी पाणी पुलावरून वर आलं आणि रस्त्यावरून गावात शिरलं. पुलाच्या खालच्या बाजूने जवळच बंधारा असल्यानं ते धोकादायक ठरतात.

हेही वाचाः देशातील आकर्षक विमानतळांमध्ये गोवा विमानतळाचा समावेश

घोटेलीला पुरापासून वाचवण्यासाठी हा बंधारा काढावा लागणार

यासंबंधी घोटेली २ येथील पंचसदस्य लक्ष्मण गावस यांनी सांगितलं, की घोटेलीतील बंधाऱ्यामुळे घोटेलीत पुराची स्थिती निर्माण होते. या बंधाऱ्यामुळे या ठिकाणी नदीचं पाणी जोराने वाहत नाही, ते इथे फुगून राहतं आणि पाणी बाहेर फुटतं. घोटेलीला पुरापासून वाचवण्यासाठी हा बंधारा काढावा लागणार आहे. तेव्हा सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष वेधावं अशी मागणी केली.

हा व्हिडिओ पहाः Breaking | Politics | येडियुरप्पा यांचा अखेर मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा


ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!