कोविडनंतर आता गोव्यात डेंग्यू, मलेरियाचा धोका; सरकार पुन्हा निद्रस्त!

'आप'चा सरकारला टोला

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः राज्यात कोविडची प्रकरणं असतानाच आता शहरी भागात डेंग्यू आणि मलेरियाच्या रुग्णात वाढ होताना दिसत आहे. गेल्या आठवड्यात म्हापशात कमीतकमी ३२ संशयित प्रकरणे समोर आली आहेत. याचा परिणाम संपूर्ण बार्देश तालुक्यात दिसत आहे. फोंडयात डेंग्यूची संशयित २३ प्रकरणे आढळून आली आहेत, मडगावसह चिखली प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. हे स्पष्ट आहे की सरकार, आरोग्य खाते आणि स्थानिक आमदारांना गोंयकारांना या आजाराशी लढण्यात मदत करण्यात कमी रस आहे, असा टोला ‘आप’ने लगावलाय.

हेही वाचाः ROBBERY | उत्तर गोव्यात कार फोडून स्टेरिओ चोरणाऱ्यांचा धुमाकूळ

म्हापशात चिंताजनक ३२ प्रकरणे आहेत. या संशयित प्रकरणांचा परिणाम बार्देशमध्ये मोठ्या प्रमाणात झाला आहे. यात कांदोळी आरोग्य केंद्रात १४, कोलवाळे आरोग्य केंद्रात १६ प्रकरणांसह, हळदोण आणि शिवोलीमध्ये रुग्णांची वाढ झाली आहे. फोंडयात डेंग्यूचे २३ संशयित रुग्ण आढळले आहेत. १२ ऑगस्ट रोजी चिखली आरोग्य केंद्राने असंही नोंदवले आहे की, ते खाटांच्या कमतरतेमुळे ग्रस्त आहेत.

सरकार आणि स्थानिक आमदार गंभीर नाहीत

हे स्पष्ट आहे की भाजप सरकार किंवा स्थानिक आमदार गोव्याच्या आरोग्यावर असलेला हा धोका गंभीरपणे घेत नाहीत. फॉगिंग ऑपरेशन्स कमीत कमी आणि अप्रभावी आहेत आणि केसेस कमी करण्यासाठी किंवा आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी दीर्घकालीन योजना नाही. शिवाय कोविड प्रकरणांमध्ये वाढ झाल्यानं आरोग्यसेवा तयारीला प्राधान्य मिळतं.

हेही वाचाः 988 रुपये भरा आणि घरी आणा ब्रॅंडेड एसी

‘आप’च्या दिल्लीतील हेल्थकेअर मॉडेलची प्रशंसा

इथे हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, की ‘आप’च्या दिल्लीतील हेल्थकेअर मॉडेलची प्रशंसा करण्यात आली आहे. जिथे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी स्वतः संवादी मोहिमांनी यशस्वीरित्या राष्ट्रीय राजधानीत वेक्टर जनित रोगांचा सामना केला आहे. त्या तुलनेत सावंत सरकार आणि आरोग्य मंत्री विश्वजीत राणे कृतीशून्य आहेत.

हेही वाचाः ‘या’ आर्मी फोटोग्राफरने कॅमेऱ्यात टिपला स्वतःच्या मृत्यूचा क्षण

‘आप’कडून बाणावलीत फॉगिंग

बाणावलीमध्ये कॅप्टन वेन्झी व्हीएगस आणि हॅन्झेल फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली ‘आप’ने त्यांच्या नियमित उपक्रमांचा भाग म्हणून महत्त्वाच्या सार्वजनिक ठिकाणी फॉगिंग करत आहे. त्यांनी बाणावली ते करमोणे-केळशी पर्यंतच्या सर्व पंचायतींना फॉगिंग मशीन देखील वाटल्या आहेत. फॉगिंग उपकरणांनी सुसज्ज असलेल्या सर्व फॉगिंग मशीन्स पंचायतींसाठी उत्तम प्रकारे काम करतात की नाही याची खात्री करण्यासाठी चाचणी घेतली गेली. दुर्दैवाने ही निकड सरकार आणि विद्यमान आमदारांमध्ये नाही.

हेही वाचाः पेडणे नगरसेविका रमल्या गणेशमूर्ती रंगकामात

सरकार निंद्रस्त

याबाबत आपचे गोव्याचे संयोजक राहुल म्हांबरे म्हणाले की, पुन्हा एकदा सरकार आणि त्याचे आमदार आरोग्य संकटाच्या वाढीदरम्यान झोपलेले आढळले आहेत. म्हापसामध्ये आमदार जोशुआ डिसूझा यांनी या धोक्याशी लढण्यासाठी एकही फॉगिंग उपक्रम आयोजित केलेला नाही. सरकारच्या आळशीपणामुळे गोंयकारांना पुन्हा एकदा जीव गमवावा लागेल का? असा प्रश्न म्हांबरेंनी उपस्थित केलाय.

हा व्हिडिओ पहाः Corona Vaccine | Vacciation | झायडस कॅडिलाच्या ‘जॉयकोव्ह-डी’ लसीला परवानगी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!