वांते पिळयेवाडा रस्त्याची मागणी अखेर पूर्ण

सरकारच्या आदीवासी खात्यांतर्गत दिलेल्या फंडातून रस्त्याचं काम पूर्ण

विश्वनाथ नेने | प्रतिनिधी

वाळपईः भिरोंडा पंचायत क्षेत्रातील वांते पिळयेवाड्यावरली स्थानिकांची डांबरी जोड रस्त्याची मागणी अखेर कित्येक वर्षांनी पूर्ण झालीय. सरकारच्या आदीवासी खात्यांतर्गत दिल्या गेलेल्या फंडातून हा जोड रस्ता करण्यात आलाय.

हेही वाचाः मोरजीत 318 नागरिकांनी घेतली लस

4 लाख रुपये खर्चून रस्त्याचं काम पूर्ण

पिळयेकर वाड्यावर साधारण 30 घरं आहेत. डांबरी जोड रस्ता नसल्यानं या भागातील लोकांची मोठी गैरसोय होत होती. मात्र आता रस्त्याची मागणी पूर्ण झाल्यानंतर लोकांची होणारी गैरसोय दूर होणार आहे. पिळयेकर वाडा भाग भिरोंडा पंचायतीच्या प्रभाग क्रमांक 3 मध्ये येतो. दिडशे मिटरांचा हा डांबरी जोड रस्ता साधाराण 4 लाख रुपये एवढा खर्चून करण्यात आलाय. हा रस्ता व्हावा यासाठी कित्येत वर्षांपासून लोक मागणी करत होते.

हेही वाचाः पिसुर्लेत चिरेखाणीत महिलेची आत्महत्या

आदिवासी कल्याण खात्याचं सहकार्य

हा रस्त्या करण्यासाठीच्या तांत्रिक बाबींमध्ये लोकांनी चांगलं सहकार्य केलं. त्याचप्रमाणे बीडीओ, पंचायत मंडळ आणि आदिवासी कल्याण खात्यानेही या रस्त्याच्या कामात खूप सहकार्य केल्याचं भिरोंडा पंचायतीचे विद्यमान पंच आणि माजी सरपंच नितीन शिवडेकर यांनी सांगितलं. आपण सरपंच असताना अनेक विकासकामांना मंजुरी मिळाली होती. आपल्याच कार्यकाळात पिळयेकर वाड्यावरील हा डांबरी जोड रस्ता मंजुर झाला होता, असं शिवडेकरांनी सांगितलं. सद्या कोविडमुळे भिरोंडा पंचायत क्षेत्रातील गटार, संरक्षक भिंत अशी विकासकामं प्रलंबित असल्याचंही शिवडेकर म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!