चिकनची मागणी घटली; लॉकडाऊनमुळे राज्याला चिकन पुरवणाऱ्या व्यावसायिकांचं नुकसान

नुकसान भरून काढण्यासाठी गोव्यातील पोल्ट्री शॉप्स, रेस्टॉरंट्सच्या वेळा शिथिल करण्याची पोल्ट्री व्यावसायिकांची मागणी

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः गोवा, कर्नाटक तसंच सीमावर्ती राज्यांमधील भागात अंड्यांचा वापर जरी वाढला असला, तरी बेळगावी आणि गोवा भागात यांचा वापर कमी झालाय. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात ब्रॉयलर चिकन विक्रीवर परिणाम झालाय, ज्यामुळे पोल्ट्री उद्योगाचं मोठे नुकसान झालंय.

हेही वाचाः ACCIDENT | कोरकरणवाडा तलावात बुडून एकाचा मृत्यू

चिकन शॉप्स, रेस्टॉरंट्सच्या वेळा शिथिल करा

बेलगावी गोव्याला दररोज सुमारे १५,००० कोंबड्या पुरवते. धारवाड, बल्लारी, गदग, हुबळी, कोल्हापूर आणि सिंधुदुर्गातील लेयर पोल्ट्री व्यवसायिकांकडून राज्याला अंड्यांचा पुरवठा होतो. अंडी सेवनात वाढ झाल्यामुळे लेयर शेतकऱ्यांना फायदा झाला असला, तरी चिकनचे दर कमी झाल्याने बेळगावी भागातील पोल्ट्री शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होतंय. झालेलं नुकसान भरून काढण्यासाठी राज्यातील बॉयलर फार्मचे मालक चिकन शॉप्स आणि रेस्टॉरंट्सच्या वेळा थोड्या शिथिल करण्याची मागणी करत आहेत.

हेही वाचाः प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाच्या अध्यक्षपदी संदेश खोर्जुवेकर

म्हणून चिकनची मागणी घटली

आघाडीचे पोल्ट्री व्यावसायिक आणि क्वालिटी फीड्स अँड बेलचिक ब्रँडचे संचालक, बेळगावीतील गोव्याचे प्रमुख पुरवठादार संजीव देशपांडे म्हणाले की, कर्नाटक आणि गोव्यात अंड्यांच्या विक्रीत सुमारे 20 टक्क्यांनी वाढ झाली आहे, परंतु त्याच वेळी दोन्ही राज्यांनी लॉकडाऊन जाहीर केल्यापासून बॉयलर चिकनची विक्री झपाट्याने कमी झाली आहे. सामान्यत: चिकन हॉटेल्स आणि रेस्टॉरंटमध्ये विकले जाते, जे आता बंद आहेत. सामान्य विक्रीच्या केवळ १५ ते २० टक्के टेकवे आहेत. शिवाय, लॉकडाऊनदरम्यान चिकन शॉप्स चालवण्यासाठी देण्यात आलेल्या मर्यादित वेळेमुळे चिकनच्या विक्रीवरही परिणाम झाला आहे, असं देशपांडे म्हणाले.

हेही वाचाः ACCIDENT | धारबांदोड्यात महाराष्ट्र-गोवा वाहन टक्कर; एकजण जखमी

इतर खर्चासह पोल्ट्रीचा खर्च वाढला

सामान्य काळात आम्ही दररोज सुमारे ७००० कोंबड्या गोव्यात पाठवतो, परंतु ही मागणी केवळ २५०० कोंबड्यांवर आली आहे, ज्यामुळे आम्ही मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करत आहोत. इतर खर्चासह पोल्ट्रीचा खर्च वाढला आहे, तर विक्री कमी झाली आहे, ज्यामुळे पोल्ट्री उद्योगाचं मोठं नुकसान होत आहे. यामुळे बेळगावी भागातील अनेक पोल्ट्री फार्म्सही बंद झाली आहेत. चिकन हे मुख्य अन्न असल्यानं अधिकाऱ्यांनी चिकन शॉप्सच्या दुकानांची आणि रेस्टॉरंटची वेळ शिथिल करण्याकडे गांभीर्याने विचार केला पाहिजे, असं देशपांडे म्हणाले.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!