गोव्यात डेल्टा व्हेरियंट स्ट्रेनच्या रुग्णांची नोंद

शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आढळले रुग्ण

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होतो म्हणेस्तोवर एक धक्कादायक बातमी समोर आलीये. पुणे येथील व्हायरॉलॉजी लॅबमध्ये पाठविलेल्या कोरोना नमुन्यामध्ये डेल्टा व्हेरियंट स्ट्रेनच्या २६ रुग्णांची नोंद झाल्याचं समोर येतंय. कोरोना व्हायरसच्या या स्ट्रेनचा प्रसार प्रचंड वेगाने होत असून लक्षणे आणि शरीरावर परिणाम वेगाने होतो म्हणून हा धोकादायक स्ट्रेन असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिलीये. तसंच कप्पा व्हेरियंट स्ट्रेनच्या ६ रुग्णांची आणि अल्फा व्हेरियंट स्ट्रेनच्या एका रुग्णाची नोंद झालीये.

हेही वाचाः भाजप या ‘सात’ जणांना वगळण्याची शक्यता!

शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातही आढळले रुग्ण

गोव्याच्या शेजारच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात डेल्टा व्हेरियंट स्ट्रेनची नोंद झालीये. त्याचबरोबर महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि केरळमध्येही हा स्ट्रेन आढळून आला असल्याचं बोललं जातंय. पुण्यातील प्रयोगशाळेत १२२ नमुने पाठवले होते. त्यातील ८९ नमुन्यांचे अहवाल येणं बाकी असल्याची माहिती समोर येतेय.

हेही वाचाः मल्ल्या, मोदी, चोक्सी यांची 9,371 कोटींची संपत्ती सरकारी बँका-केंद्राकडं हस्तांतरित

कोरोना संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचं पालन होणं अत्यावश्यक

यापूर्वी राज्यात युके, यूएस आणि महाराष्ट्रातील डबल म्युटंट स्ट्रेनची नोंद झाली आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, या वेगवेगळ्या स्ट्रेनमध्ये खूप बदल (व्हेरिएशन) होत असल्याने कोरोना संदर्भातील मार्गदर्शक तत्त्वांचं पालन होणं अत्यावश्यक आहे.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!