DELTA VARIANT | डेल्टा व्हेरियंटचे आणखी 64 रुग्ण समोर

पुण्यातील राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये जिनोमिक चाचणीचा अहवाल गोवा आरोग्य खात्याच्या हाती

Goan Varta Live | प्रतिनिधी

ब्युरो रिपोर्टः पुणे येथील राष्ट्रीय प्रयोगशाळेमध्ये जिनोमिक चाचणीसाठी पाठविलेल्या चाचण्यांचा अहवाल गोवा आरोग्य खात्याच्या हाती आला आहे. यामधील 64 नमुने कोरोनाच्या डेल्टा स्ट्रेनचे आहेत.

हेही वाचाः SHOCKING VIDEO | हत्येचा थरार सीसीटिव्हीमध्ये कैद

184 पैकी 64 रुग्णांचे नमुने डेल्टाचे

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमधील 184 नमुने पुणे येथे चाचणीसाठी पाठवले होते. त्यातील 64 रुग्णांचे नमुने डेल्टाचे असल्याचं समोर आलं आहे. हे प्रमाण 94 टक्के असल्याची माहिती मिळाली. राज्यात अद्यापही डेल्टा प्लस स्ट्रेनची नोंद झालेली नसल्याची माहिती आरोग्य खात्यातील साथीरोग तज्ज्ञ डॉ. उत्कर्ष बेतोडकर यांनी दिली.

हेही वाचाः डिजिटल मीटरला विरोध; उद्या हायकोर्टात याचिकेवर सुनावणी

डेल्टा प्लस हा स्ट्रेन इतर स्ट्रेनच्या तुलनेत अधिक घातक

राज्यात आतापर्यंत डेल्टा व्हेरियंट स्ट्रेन, अल्फा व्हेरियंट आणि कप्पा व्हेरियंट स्ट्रेनचे पण आढळल्याचे समोर आले आहेत. डेल्टा प्लस हा स्ट्रेन इतर स्ट्रेनच्या तुलनेत अधिक घातक आहे. राज्यामध्ये कोरोना रुग्णांचे आकडे वाढत आहेत. गेले तीन दिवस राज्यात 100 च्या घरात रुग्ण आढळत होते. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी हा आकडा 60 पेक्षा कमी होता. मात्र सध्या आकडा वाढत असल्यानं आरोग्य खात्याने काळजी घेण्यासाठीचा सल्ला दिला आहे.

हेही वाचाः शॉर्ट सर्किटमुळे वाळपईत घराला आग

संचारबंदीत 16 ऑगस्टपर्यंत वाढ

उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाने संचारबंदी 16 ऑगस्टपर्यंत वाढविली असल्याचा आदेश रविवारी जारी केला. कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही वाढ करण्यात आली आहे. राज्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी दर जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत संचारबंदी हटवण्याबाबत विचार केला जाणार नसल्याची माहिती काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली होती. तसंच गणेशचतुर्थीच्या पार्श्वभूमीवर नवा एसओपी राबविण्याचा प्रयत्न असल्याचंसुद्धा ते म्हणाले होते.

हेही वाचाः ACCIDENT | फोंडा – सावईवेरे मार्गावरील कदंबा बसचा अपघात

रविवारी एकाचा मृत्यू; 69 जणांना कोरोनाची लागण

रविवारी 69 जणांना कोरोनाची लागण झाली आहे, तर एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचा राज्यातील दर 97.59 टक्के आहे. सक्रिय रुग्णांचा आकडा 987 पर्यंत घटला असल्याची माहिती आरोग्य खात्यातून मिळाली.

हा व्हिडिओ पहाः Video | Sattari Landslide | जंगल तोडून अतिक्रमण केल्यामुळे डोंगर कोसळला?

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!