‘डेल्टा प्लस’अलर्ट : ‘सीएम’ नी केली केरी चेकपोस्टची पाहणी !

देशात डेल्टा प्लस रुग्णांची संख्या पोहोचली 51 वर !

देविदास गावकर | प्रतिनिधी

सत्तरी : एकीकडं महाराष्ट्र आणि दुसरीकडं कर्नाटक, या दोन्ही राज्यात कोरोना डेल्टा प्लसचे रूग्ण असल्यामुळं गोव्याच्या सर्वच सीमांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आलीय. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत हे स्वतः प्रत्यक्ष भेट देवून गोव्याच्या सीमांवरची सुरक्षा व्यवस्था तपासत आहेत.

कोरोनाची दुसरी लाट कमी होत असतानाच डेल्टा प्लस या कोरोनाच्या विषाणूनं धास्ती वाढवली. गोव्यात अलिकडच्या काळात मोठया प्रमाणावर कोरोनावर नियंत्रण आलं असताना या नव्या विषाणूनं आता टेन्शन वाढवलंय. कारण, गोव्यानजीकच्या सिंधुदुर्गात एक रूग्ण तर कर्नाटकात 2 रूग्ण आढळले. कोकणातल्या रत्नागिरीत एक रूग्ण दगावल्याचीही बातमी आहे. या दोन्ही राज्यातुन गोव्याला अत्यावश्यक वस्तु आणि भाजीपाला पुरवला जातो. डेल्टा प्लस विषाणूची देशात वाढ होतेय असं म्हणता येणार नाही, असं आरोग्य खातं सांगतंय. मात्र, या केसेसची संख्या 48 वरून आता 51 वर गेलीय.

दरम्यान, या दोन्ही राज्यातुन असा कोणताही डेल्टा प्लसचा संसर्ग गोव्यात पोहोचू नये, यासाठी पुर्णपणे दक्षता घेण्यात येतेय. मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत हे स्वत: तपासणी नाक्यांना भेट देवून पाहणी करत आहेत. आजही सकाळी त्यांनी केरी चेकपोस्टला भेट देवून तिथल्या सुरक्षा यंत्रणेची पाहणी केली. तिथल्या अधिकारी वर्गाला सुचना दिल्या.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!