दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं गोव्यात आगमन

दोन दिवसांचा दौरा; निवडणूक तयारीचा घेणार आढावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजीः आम आदमी पार्टी (आप)चे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचं दुपारी दाबोळी विमानतळावर आगमन झालं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी तसंच निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नेते तसंच कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करण्यासाठी अरविंद केजरीवाल दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.

हेही वाचाः तोरसे सरपंचपदी दलित समाजाच्या उत्तम वीर यांची बिनविरोध निवड

अरविंद केजरीवालांचा दोन दिवसीय कार्यक्रम

दुपारी 2.30 च्या दरम्यान अरविंद केजरीवाल यांचं गोवा विमानतळावर आगमन झालं आहे. आज संध्याकाळी ते पणजी येऊन ‘आप’च्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. तर बुधवारी ते पत्रकारांशी तसंच कार्यकर्त्यांशी संवाद साधण्याची शक्यता वर्तवली जातेय. 

हेही वाचाः शैक्षणिक संस्थांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणं गरजेचं

गोव्याचं राजकारण बदलण्यासाठी केजरीवाल गोव्यात

‘आप’ने दहा दिवसांपूर्वी ‘चला, गोव्यातील राजकारण स्वच्छ करूया’ ही मोहीम सुरू केली आहे. भाजप आणि काँग्रेस गोमंतकीयांच्या भावनांशी खेळत आहेत असा आरोप ‘आप’ने केला आहे. विकासाच्या नावाखाली फसवणूक आणि खोटी आश्वासने जनतेच्या पदरात पडत आहेत, असंही ‘आप’चं म्हणणं आहे. अरविंद केजरीवाल गोव्याचे राजकारण बदलण्यासाठी येत आहेत, अशी चर्चा सुरू आहे.

गोव्याला प्रामाणिक राजकारण हवं

आमदारांची खरेदी-विक्री करणाऱ्या राजकीय पक्षांची मक्तेदारी आता खूप झाली. घाणेरडे राजकारण आता थांबवावं लागेल. गोव्याला विकास हवा आहे. गोव्यात निधीची कमतरता नाही, फक्त प्रामाणिक हेतूची कमतरता आहे. गोव्याला प्रामाणिक राजकारण हवं आहे, असं अरविंद केजरीवाल यांनी ट्विट करताना म्हटलंय.

हा व्हिडिओ पहाः Video | LEOPARD | कारमधील कॅमेरात बिबट्या कैद

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!