भाजपला हरवणे हा त्यांचा एकमेव अजेंडा

सदानंद तानावडे ; भाजपाचे नेते प्रचारात भाग घेणार

Goan Varta Live | प्रतिनिधी

पणजी : येत्या काळामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय रस्ता वाहतूक मंत्री नितीन गडकरी व केंद्रीय महिला व बालकल्याण खात्याच्या मंत्री स्मृती इराणी या गोव्यात दाखल होऊन भाजपाच्या प्रचारात भाग घेणार आहेत. अशी माहिती भाजपाचे प्रदेश अध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी दिली.

हेही वाचाः’हा’ प्रकार म्हणजे बालिशपणाचा कहर

भाजपचे नेते उपस्थित

पणजी येथील भाजपाच्या प्रचार कार्यालयामध्ये आयोजित पत्रकार परिषदेत सदानंद शेट तानावडे बोलत होते. यावेळी भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते केशव उपाध्ये, महाराष्ट्र भाजपच्या उपाध्यक्ष चित्रा वाघ व भाजपाचे प्रदेश सरचिटणीस आणि माजी खासदार एडवोकेट नरेंद्र सावईकर उपस्थित होते.

हेही वाचाःफूट पाडणाऱ्यांच्या विरोधात लढूया

नेते प्रचार करताना नियमांचे पालन करतील

ते पुढे म्हणाले, गोव्यात दाखल झालेले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व भाजपाचे गोवा निवडणूक प्रभारी देवेंद्र फडणवीस व गोवा प्रभारी सी टी रवी हे भाजप उमेदवारासोबत चर्चा करणार आहेत. तसेच भाजपाचे नेते प्रचार करताना कोरोना नियमांचे पालन करतानाच निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करतील असेही तानावडे यावेळी म्हणाले.

हेही वाचाः५० कोटी घेऊन नवीन पक्षात प्रवेश !…

भाजपला हरवणे हा त्यांचा एकमेव अजेंडा

भाजपाने पहिल्यांदाच गोव्यातील चाळीसही मतदारसंघात उमेदवार ठेवण्याचे ठरवले असून ३४ उमेदवार जाहीर केले असून इतर सहा आज रात्री किंवा उद्या जाहीर होतील असेही तानावडे यांनी यावेळी सांगितले. इतर पक्ष स्वतः जिंकण्यासाठी लढत नसून फक्त ते भाजप हरवण्यासाठी लढत आहेत. भाजपला हरवणे हा त्यांचा एकमेव अजेंडा असल्याचे तानावडे यावेळी म्हणाले.

हेही वाचाः मगोची पहिली यादी जाहीर

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!