गोवा फॉरवर्डच्या दीपक कळंगुटकरांच्या हस्ते पार्सेतील शर्वाणीचा गौरव

म्हापशातील वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालयात 98.66 टक्के गुण मिळवत पहिली आल्याने केलं कौतुक

निवृत्ती शिरोडकर | प्रतिनिधी

पेडणेः अगदी प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत म्हापसा येथील वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालयात १२ वी विज्ञान शाखेत पार्से येथील शर्वाणी श्यामसुंदर कांबळी हिने ९८.६६ टक्के गुण मिळवत विद्यालयात प्रथम येण्याचा मान मिळवला. तिला एकूण ६०० पैकी ५९२ गुण मिळालेत. गणित, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि हिंदी विषयात तिला १०० टक्के गुण मिळालेत, तर जीवशास्त्रात ९८ आणि इंग्रजीत ९४ टक्के गुण मिळालेत.

हेही वाचाः ACCIDENT | सावईवेरेत शॉक लागून तिघांचा मृत्यू

मधलावाडा पार्से येथील शर्वाणीने दहावीच्या परीक्षेत तुये येथील डॉन बॉस्को हायस्कूलमधून ९४ टक्के गुण मिळवून पेडणे तालुक्यात प्रथम येण्याचा मान मिळवला होता. तिने आतापर्यंत कुठेही खासगी शिकवणी घेतलेली नाही. ती एक सर्वसामान्य कुटुंबातील मुलगी आहे. तिचे वडील एका खासगी आस्थापनात सेकुरिटी गार्ड म्हणून कामाला आहेत, तर आई घरकाम करते. तिची घरची परिस्थितीत बेताचीच आहे.

हेही वाचाः ‘आप’चे पेट्रोल दरवाढी विरोधात आंदोलन!

तिचं प्राथमिक शिक्षण मधलावाडा पार्से येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात झालंय. त्यानंतर तिने तुयेच्या डॉन बॉस्को हायस्कूलमध्ये शालेय शिक्षण पूर्ण केलं. तिने म्हापसा येथील वालावलकर उच्च माध्यमिक विद्यालयातून 12वीची परीक्षा दिली. भविष्यात वैद्यकीय शिक्षण घेण्याचा तिचा मानस आहे.

हेही वाचाः वर्ष १९८२ नंतरचा सर्वांत मोठा पूर: मुख्यमंत्री

या यशवंत विधार्थिनीचा गोवा फॉरवर्डचे नेते दीपक कळंगुटकर यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यावेळी पंच अरुण पार्सेकर, शेखर पार्सेकर, महेश कांबळी, प्रियेश गवंडी उपस्थित होते.

हा व्हिडिओ पहाः Super Exclusive | विश्वजीत राणेंकडून पूरस्थितीची पाहणी

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!