दीपक ढवळीकर यांना हृदयविकाराचा झटका
प्रकृती स्थिर; काळजी करण्याचे कारण नाही : सुदिन ढवळीकर

सचिन खुटवळकर | प्रतिनिधी
पणजी : मगोप अध्यक्ष दीपक ढवळीकर यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आला असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असून काळजी करण्याचे कारण नसल्याचे त्यांचे बंधू तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांनी सांगितले.