मी प्रियोळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार

मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकरांचा दावा

Goan Varta Live | प्रतिनिधी

फोंडाः महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे (मगोप) अध्यक्ष दीपक ढवळीकरांनी आपण प्रियोळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं आहे. प्रियोळचे आमदार गोविंद गावडेंनी प्रियोळ मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची इच्छा बोलून दाखवल्यानंतर काही दिवसांनी ढवळीकरांनी हे विधान केलंय.

हेही वाचाः छत्रपती शिवाजी महाराजांची परदेशातील तीन चित्रे प्रकाशात

‘युती कुठे होत आहे’

मी मगोपच्या तिकिटावर प्रियोळ मतदारसंघातून विधानसभा निवडणूक लढवणार आहे, असं सांगताना पोटनिवडणुकीदरम्यान त्यांनी निवडणूक लढवलेल्या शिरोडा मतदारसंघातून त्यांचे हित संबंध बदलले आहेत असं सूचवलं. ढवळीकरांनी यापूर्वी प्रियोळ मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. भाजपशी होणाऱ्या संभाव्य युतीच्या चर्चेमध्ये त्यांची भूमिका अडथळा तर ठरणार नाही का, या प्रश्नावर ‘युती कुठे होत आहे’ असा पलटवार त्यांनी केला.

हेही वाचाः स्वतंत्र कायद्यानंतरही सामाजिक बहिष्काराचे 6 वर्षात 104 गुन्हे

निवडणुका जाहीर झाल्यावरच संपूर्ण निर्णय

मगोपसाठी १२ जागा सामायिक करण्यास तयार असलेल्या गटांनी युतीच्या चर्चेसाठी पुढे यावं आणि फोंड्यातील चारही मतदारसंघ ढवळीकरांच्या नेतृत्वाखालील पक्षासोबत असावेत, असं ढवळीकर म्हणालेत. मगो पक्ष ‘एकल जाणं पसंत करू शकतो’ परंतु जेव्हा औपचारिकपणे निवडणुका जाहीर केल्या जातील तेव्हाच संपूर्ण निर्णय घेतला जाईल, असं ढवळीकरांनी सांगितलंय.

ताज्या घडामोडी, अपडेट्स आणि तुमच्याशी निगडीत प्रत्येक गोष्ट मिळवा एका क्लिकवर! फेसबुक आणि ट्विटरवर आम्हाला फॉलो करा तसेच युट्युब, व्हाटसअप आणि टेलिग्रामवर सबस्क्राईब करायला विसरु नका.
error: Content is protected !!